Manoj Jarange Patil, Devendra Fadnavis Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil : फडणवीस यांनी ठरवले तर ते आरक्षण देऊ शकतात, पण त्यांना ते द्यायचे नाही..

Jagdish Pansare

दिलीप दखणे

Maratha Reservation News : राज्याची सत्ता सत्तर वर्ष प्रस्थापितांच्या हाती होती, त्यांना खूप संधी मिळाली. आता एकदा गोरगरिबांवर विश्वास दाखवा, असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले. अंतरवाली येथे माध्यमांशी बोलतांना मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

फडणवीसांनी (Devendra Fadanvis) ठरवलं तर ते एका दिवसात आरक्षण देऊ शकतात, पण ते चालढकलपणा करतात. ते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत, पण त्यांची एखाद्या समाजाला संपवण्याची कार्यपद्धती पाहता त्यांना संपवा संपवी खात्याचे मंत्री केले पाहिजे, असा टोला जरांगे पाटील यांनी लगावला.

राज्यात गोरगरिबांची सत्ता आणण्यासाठी समाजातील सर्व वंचित घटकांनी आता एकत्र आले पाहिजे. शेती, नोकरी, आरक्षण, शिक्षणाचे प्रश्न भेडसावत आहेत. हे प्रश्न सुटत नाही, त्यासाठी आवाज उठवला तर हे आमच्यावर लाठ्या चालवणार. यांच्या लाठ्या काठ्या खाण्यापेक्षा सत्तेत बदल घडवण्यासाठी राज्यातील सर्व सामान्य कार्यकर्त्यांनी, जनतेने ,वंचित घटकांनी एकत्र यावे आणि या प्रस्थापितांच्या विरोधात उभे राहावे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात राज्य आहे. यांनी ठरवले तर एका दिवसात ते मराठा आरक्षण देऊ शकतात. मुळात यांना आरक्षण द्यायचे नाही, धनगर समाज ,मराठा समाज यांच्या आरक्षणाचा विषय फडणवीस यांनी घोळत ठेवला आहे.

(Manoj jarange Patil) फडणवीस यांच्या बाजुने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतात, ते ऐकमेकांच्या विरोधात कधी बोलणारच नाहीत. ते सत्तेत आहे त्यामुळे ते एकमेकाच्या विरोधात बोलत नाहीत. सत्तेत जाऊन आपले हक्क घ्यावे लागतील, त्यासाठी सर्वांनी सोबत आलं पाहिजे.

विधानसभा निवडणूबाबत ता. 29 रोजी जो बैठकीत निर्णय होईल. त्यानंतर दिशा ठरवली जाईल, सर्व धर्माच्या गोर-गरीबांनी आपले उमेदवार द्यावे. एकत्र येऊण पाडले तसे एकत्र येऊन आपले अपक्ष उमेदवार विधानसभा निवडणूकी मध्ये विजयी करायचे आहे.

75 वर्ष दुसऱ्याला संधी दिली, पाच वर्ष गरीब जनतेला संधी द्या. आपली आघाडी नाही तर सर्व मिळुन अपक्ष उभे करायचे आहेत. शासनाने अद्याप आरक्षणाचा निर्णय घेतला नाही, आता ठरल्याप्रमाणे 29 पर्यंत वाट पाहू, असेही मनोज जरांगे यांनी यावेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT