Devendra Fadnavis Sarkarnama
मराठवाडा

Devendra Fadnavis Hordings: मराठा समाजासाठी फडणवीसांनी काय कामं केलीत? संभाजीनगरमध्ये झळकले होर्डिंग्ज

Devendra Fadnavis Hordings: मराठा आरक्षणासाठी आंदोलक नेते मनोज जरांगे हे मुंबईतल्या आझाद मैदानात बेमुदत उपोषणाला बसले आहेत.

Amit Ujagare

Devendra Fadnavis Hordings: मराठा आरक्षणासाठी आंदोलक नेते मनोज जरांगे हे मुंबईतल्या आझाद मैदानात बेमुदत उपोषणाला बसले आहेत. त्यांनी महायुती सरकारला विशेष करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आरक्षणासाठी धारेवर धरलं आहे. यापार्श्वभूमीवर सरकारनं मराठा समाजासाठी काय काय केलं? हे सांगण्यााच प्रयत्न सरकारकडून सुरु असल्याचं दिसून आलं आहे. संभाजीनगर शहरात याबाबतचे फ्लेक्स लागले आहेत.

मराठा आरक्षणानिमित्त मुंबईत आरक्षणाचे होर्डिंग लागले आहेत तर महायुती सरकारनं मराठा समाजासाठी काय काय केलं? याचे होर्डिंग्ज संभाजीनगरमध्ये लावण्यात आले आहेत.

या होर्डिंग्जला 'मराठा समाजासाठी मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांचे ऐतिहासिक निर्णय व कार्य' असं टायटल देण्यात आलं आहे.

यामध्ये म्हटलंय की,

  1. छत्रपती शिवाजी महाराज स्मृतीग्रंथांच्या ५०,००० प्रती प्रकाशित.

  2. डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह योजनेंतर्गत ३,७९,३७३ विद्यार्थ्यांना १२९३ कोटी रुपये वितरित केले.

  3. स्वाधार योजनेंतर्गत प्रतिवर्ष प्रतिविद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्त्यात वाढ करण्यात आली आहे.

  4. त्यानुसार, महागनरांमध्ये ६०,००० रुपये, विभागीय मुख्यालय ठिकाणी ५१,००० रुपये, जिल्ह्याच्या ठिकाणी ४३,००० आणि तालुक्याच्या ठिकाणी ३८,००० रुपये थेट विदयार्थ्यांच्या खात्यात जमा केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT