Devendra Fadnavis News Sarkarnama
मराठवाडा

Devendra Fadnavis On Shivsena UBT : आम्ही केलेल्या घोषणा पूर्णच केल्या, तुम्ही अडीच वर्षे माश्या मारत होतात का ?

Aurangabad Political News : योजनांचे मुडदे पाडायचे आणि वर पुन्हा मराठवाड्यासाठी काय केले असे विचारायचे?

Jagdish Pansare

Marathwada Cabinet Meeting News : मराठवाडा मुक्ती संग्राम अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सात वर्षांनंतर छत्रपती संभाजीनगरात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. २०१६ मध्ये मराठवाड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet Meeting News) तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४९ हजार कोटींच्या योजनांची घोषणा केली होती. या मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गटाने मागच्या घोषणांचे काय झाले? तेही सांगा, असे आव्हान देत टीका केली आहे.

यावर बैठकीसाठी आलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे गटावर पलटवार करताना तुम्ही अडीच वर्षे माश्या मारत होतात का? असा सवाल केला आहे. (Shivsena) आम्ही मंजूर केलेल्या योजनांचा मुडदा पाडण्याचे काम तुम्ही केले आणि आता वर आम्हालाच विचारता की, मराठवाड्यासाठी तुम्ही काय केले? अशा शब्दांत फडणवीस यांनी ठाकरे गटाला सुनावले. चिकलठाणा विमानतळावर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीसांनी वाॅटरग्रीड योजनेचा आवर्जून उल्लेख केला.

मंत्रिमंडळ बैठकीच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी २०१६ मध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत केलेल्या घोषणांची अंमलबजावणीच झाली नाही, असा आरोप करत १६ घोषणांबद्दल फडणवीसांना जाब विचारला होता. (Uddhav Thackeray) तसेच आज बैठकीपूर्वी मागच्या घोषणांचे काय झाले? हेही सांगा, असा टोला लगावला होता.

यावर फडणवीसांनी अडीच वर्षे तुम्ही काय माश्या मारत होतात का? मराठवाड्यासाठी वाॅटरग्रीडसारखी योजना दिली, त्याचा तुम्ही मुडदा पाडला. योजनांचे मुडदे पाडायचे आणि वर पुन्हा मराठवाड्यासाठी काय केले, असे विचारायचे? हा म्हणजे विरोधकांचा कावाच म्हणावा लागेल. मराठवाड्यात मंत्रिमंडळची बैठक होत असताना राजकारण करणारे हे कावेबाज लोक आहेत. २०१६ मध्ये केलेल्या सगळ्या घोषणांची अंमलबजावणी आमच्या सरकारने केली आहे.

एखादी योजना राहिली असेल तर काही अडचणींमुळे राहिली असेल. त्याची सगळी माहिती आम्ही देणार आहोत; पण अडीच वर्षे तुमची सत्ता असताना तुम्ही काय केले? राहिलेल्या योजना पूर्ण करण्यासाठी किती प्रयत्न केले? उलट दिलेल्या योजनांचे मुडदे पाडण्याचेच काम तुमच्या काळात झाले, असा घणाघातदेखील फडणवीस यांनी केला.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT