Devendra Fadanvis-Sharad Pawar News, Aurangabad
Devendra Fadanvis-Sharad Pawar News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Devendra Fadnvis : आम्ही जमीनीवरच, हवेत कोण याचा शोध शरद पवारांनी घ्यावा..

सरकारनामा ब्युरो

Aurangabad : सत्तेत असलेले लोक हवेत असल्यासारखं वागतात, टोकाची भूमिका घेतात, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली होती. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ` आम्ही जमीनीवरच आहोत, आमची जमीन आम्हाला माहिती आहे, जमीनीवरच्या लोकांच्या आम्ही संपर्कात आहोत, त्यामुळे खरंच हवेत कोण आहेत? याचा शोध शरद पवारांनी घ्यावा, असे प्रत्युत्तर दिले.

फडणवीस आज औरंगाबादेत (Aurangabad) अॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पोला भेट देण्यासाठी फडणवीस आले होते. चिकलठाणा विमानतळावर माध्यमांनी शरद पवारांनी केलेल्या टीकेकडे फडणवीसांचे लक्ष वेधले. यावर (Devendra Fadanvis) फडणवीस म्हणाले, आम्ही जमीनीवरच आहोत, आमची जमीन आम्हाला माहित आहे, जमीनीवरच्या लोकांशी आम्ही कायम संपर्कात आहोत. त्यामुळे नेमकं हवेत कोण आहे? याचा शोध त्यांनी घ्यावा.

सीमावादावर महाराष्ट्राने कोर्टात आपली बाजू ज्या मजबुतीने मांडायला हवी, तितकी ती मांडली जात नाही, असेही पवार म्हणाले होते. यावर देखील फडणवीसांनी उत्तर दिले. सीमावादावर सरकार खंबीर आहे, कोर्टात आपण आपली बाजू मजबुतीनेच मांडत आहोत.

हरिष साळवी यांच्यांशी देखील आमचे बोलणे झाले आहे, ते सीमावादाच्या संदर्भात आपल्या बाजूने उभे राहणार आहेत. त्यामुळे सीमावादावर आपली बाजू मजबुत असल्याचा पुनरुच्चार फडणवीसांनी केला. सामनाच्या माध्यमातून संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर बोलण्यास फडणवीसांनी मी त्यावर बोलणार नाही, तो काही पेपर नाही, अशा शब्दात उडवून लावले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT