Dhananjay Munde : वाल्मिक कराड याने सीआयडीसमोर सरेंडर केल्यानंतर त्याला केज पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. वाल्मिक कराड हा बीडमधील पोलिस ठाण्यातील कोठडीमध्ये आहे. मात्र, याच जेलमध्ये पाच पलंग मागवल्याने वाल्मिक कराडसाठी हे पलंग मागवल्याची चर्चा आहे.
माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी 'महायुती सरकारच्या लाडके आरोपी योजनेत वाल्मीक कराड येत असल्याने बीड पोलीस स्थानकात नवीन पाच पलंग आले का? वाल्मिक कराड पोलीस कोठडी मध्ये असताना पाच पलांगांची आवश्यकता भासावी, इतके योगायोग चित्रपटात ही नसतात. आरोपीचे लाड पुवण्याची ही सुरुवात आहे, हळूहळू टिव्ही, एसी, पंचतारांकित हॉटेल मधील जेवण सगळच मिळेल', असा ट्विटवरून टोला लगावला आहे.
कराडसाठी पलंग मागवल्याची चर्चा असताना मंत्री धनंजय मुंडे यांना पत्रकारांनी या विषयी विचारले असता त्यांनी स्पष्टट सांगितले की, हा केवळ योगायोग आहे. पोलिसांनीच पलंगाची ऑर्डर पूर्वीच दिली होती. हे स्पष्ट केले आहे.
पोलिस अधिकारी म्हणाले की, दीड महिन्यापूर्वीच बीड शहर पोलिस ठाणे येथे शिफ्ट केले आहे. हे पोलिस ठाणे नवीनच आहे. पोलिस कर्मचाऱ्यांच्या 24 तास ड्युटी असते. त्यामुळे पोलिस ठाण्यातील रेस्टरूममध्ये झोपण्यासाठी पलंग नाही, त्याची सोय करावी, अशी मागणी गार्डसनी केली होती. त्यामुळे पलंग मागवण्यात आले होते.
विजय वडेट्टीवार यांनी वाल्मीक कराडवर या सरकारला निष्पक्ष कारवाई करायची आहे का? करायची असेल तर बीड जिल्ह्याच्या बाहेर चौकशी आणि तपास केला पाहिजे. ज्याने पोलिसांना आतापर्यंत आपल्या धाकात ठेवले ते त्याची चौकशी करणार की सेवा? सरकारने कराड वर कारवाई करण्याचे नाटक एकतर बंद करावे आणि कारवाई करायची असेल तर ती गांभीर्यपूर्वक करावी, अशी मागणी ट्विट करत केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.