Karuna Sharma, Dhananjay munde, Pankaja munde Sarkarnama
मराठवाडा

Karuna Sharma : मुंडे बंधु-भगिनी अ‍ॅक्टिंग करण्यात हुशार..., राजीनाम्यानंतर करूणा शर्मांनी 'हे' 5 मुद्दे उचलून धरले

Karuna Sharma Attack on Munde : संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा प्रमुख सुत्रधार वाल्मिक कराडमुळे अडचणीत आलेले अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना मंगळवारी अखेर आपल्या मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका करत मुंडेंना देखील या हत्या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी केली आहे.

Jagdish Patil

Beed News, 05 Feb : संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा (Santosh Deshmukh Murder) प्रमुख सुत्रधार वाल्मिक कराडमुळे अडचणीत आलेले अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना मंगळवारी अखेर आपल्या मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका करत मुंडेंना देखील या हत्या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी केली आहे.

अशातच आता धनंजय मुंडेंच्या (Dhananjay Munde) पत्नी करुणा शर्मा मुंडे यांनी देखील राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना मुंडेंची आमदारकी देखील रद्द करण्याची मागणी केली. मुंडेंच्या राजीनाम्यानंतर करुणा मुंडे चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोन्ही भाऊ-बहीण अ‍ॅक्टिंग करण्यात हुशार आहेत.

तसंच वाल्मिक कराड (Walmik Karad) हा मुख्य आरोपी असून सुदर्शन घुले हा लहान बच्चा असल्याचंही त्या म्हणाल्या. तर राजकारणात अनेक नेत्यांसह आमदारांकडून महिलांचा छळ केला जात आहे. अशा सर्व पीडित महिलांना घेऊन लवकरच आंदोलन करणार आहे. अशा मंत्र्यांना तात्काळ बाहेर काढण्याची देवेंद्र फडणवीस यांना विनंती करणार असल्याचंही करूणा शर्मा यांनी सांगितलं.

करूणा शर्मा नेमकं काय म्हणाल्या?

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर माध्यमांशी बोलताना करूणा शर्मा (Karuna Sharma) म्हणाल्या, धनंजय मुंडेंची हकालपट्टी केलेली आहे. नैतिकता असती तर त्यांना शपथ घेण्याचा पण अधिकार नसता. काल पंकजाताईंनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी शपथ पण द्यायला नको होती. तसंच शपथ पत्रामध्ये त्यांनी खोटी माहिती दिली आहे.

माझ्या मुलांचे नाव दिलं आहे. माझं नाव दिलेलं नाही. त्याबाबतची केस कोर्टामध्ये चालू असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. तसंच धनंजय मुंडेंना सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी देखील त्यांनी केली. त्या म्हणाल्या, "शासकीय निवासस्थानात खंडणीसाठी बैठक झाली होती. त्याची चौकशी झाली पाहिजे. चौकशीत मुंडे दोषी आढळले तर त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे."

दरम्यान, यावेळी त्यांनी मुंडे भावा-बहिणीवर हल्लाबोल केला. हे दोन्ही बहीण-भाऊ नाटकात हवे होते, अशी टीका केली. धनंजय मुंडेंच्या जीवावर पंकजा मुंडे मंत्री झाल्या. आज तुम्ही तोंड उघडत आहात. तीन महिने का गप होता? संतोष देशमुखांच्या घरी तुम्ही जायला हवं होतं. आता तुम्ही समोर येऊन ॲक्टिंग करत आहात. हे दोन्ही बहीण भाऊ नाटकात पाहिजे होते, अशा शब्दात त्यांनी मुंडेंवर हल्लाबोल केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT