Beed News : विधानसभा निवडणुकीनंतरच्या प्रचंड बहुमतानं पुन्हा एकदा सत्तेत परतलेल्या महायुती सरकारमधील पहिलीच विकेट ही मुत्सद्दी अशा धनंजय मुंडे यांच्यासारख्या नेत्याची पडली होती. पण त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन पाच महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही सरकारी 'सातपुडा' बंगला सोडलेला नाही. यामुळे प्रचंड गदारोळ झाल्यानंतर आता मोठी अपडेट समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मार्च महिन्यात मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतरही अद्याप सातपुडा सरकारी बंगला सोडलेला नाही. पण आता सूत्रांच्या माहितीनुसार, धनंजय मुंडे येत्या 30 सप्टेंबरपर्यंत आपला सरकारी सातपुडा बंगला खाली करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडून तसे आश्वासन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयाला देण्यात आले आहे. छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारुन सुमारे 4 महिन्यांचा कालावधी लोटला आहे. त्यामुळे त्यांनाही सरकारी निवासस्थानाची अजूनही प्रतीक्षा आहे.
आता धनंजय मुंडे हे लवकरच अर्थात 30 सप्टेंबरच्या आत सातपुडा हा सरकारी बंगला सोडणार असल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर तो बंगला छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना मिळणार आहे. मुंडे आणि भुजबळ यांच्या कार्यालयातील टीम याप्रकरणी एकमेकांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या महिन्याच्या अखेरीस या सरकारी बंगल्याचा ताबा भुजबळांकडे हस्तांतरित केला जाण्याची शक्यता आहे.
मंत्रिपद सोडताच मुंडेंनी सरकारी बंगला सोडणे आवश्यक होते. मात्र, मुंबईत आपले घर नाही, असे स्पष्टीकरण मुंडे यांनी दिले होते. त्यानंतर गिरगाव चौपाटीजवळ वीरभवन येथील 22 मजली इमारतीमध्ये तब्बल 16 कोटींचा प्लॅट धनंजय मुंडे यांच्या नावावर असल्याचं समोर आलं होतं.
धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी जे प्रतिज्ञापत्र दिले होते त्यामध्ये देखील या प्लॅटचा उल्लेख आहे. दरम्यान, राजीनाम्यानंतरही सरकारी बंगला सोडला नाही तर दंड आकरला जातो. मिळालेल्या माहितीनुसार, नियमानुसार तब्बल 42 लाखांवर दंडाची रक्कम गेली आहे. मात्र, या रकमेसंदर्भात देखील मुंडे यांना नोटीस पाठवली नसल्याची माहिती आहे.
धनंजय मुंडे यांचा मुंबईतील गिरगाव चौपाटीमधील प्लॅट हा अलिशान आहे. मुंडे यांनी त्यांच्या पत्नी आणि स्वतःच्या नावे या प्लॅटची खरेदी 2023 मध्ये केली होती. दोन हजार एकशे 51 चौ.फुटांचे असून त्यामध्ये चार बेडरुम असल्याची माहिती आहे. दरम्यान, मुंडेचा मुंबईत प्लॅट असल्याची माहिती समोर आली असता मुंडे यांची अजून यावर प्रतिक्रया आलेली नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.