हत्येचा कट रचल्याच्या आरोपात धनंजय मुंडेंनी मनोज जरांगे पाटील यांना ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्टचे आव्हान दिले होते.
मनोज जरांगे यांनी हे आव्हान स्वीकृत करत “सत्य बाहेर येऊ द्या” असे सांगितले.
या निर्णयामुळे पुन्हा एकदा राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे.
Maharashtra Politics : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज आपल्या हत्येचा कट धनंजय मुंडे यांनी रचला असा गंभीर आरोप केला. या आरोपानंतर राज्यात खळबळ उडाली होती. यावर काही तासातच धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे पाटील यांचे आरोप फेटाळून लावत माझी आणि त्यांची ब्रेन मॅपिंग, नोर्को टेस्ट करा, या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून करा, अशी मागणी केली होती. त्यानंतर पुन्हा मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना धनंजय मुंडे यांचे आव्हान स्वीकारले आहे.
नोर्को टेस्ट, ब्रेन मॅपिंगसाठी मी तयार आहे, कोर्टाकडून परवानगी आणा, राज्य सरकारने आदेश द्यावेत किंवा केंद्रीय गृहमंत्रालयाने आदेश काढावेत, माझी तयारी आहे. उद्याच मी गृहमंत्रालयात, कोर्टात, पोलीस अधीक्षक कार्यालय, कलेक्टर ऑफिसमध्ये जाणार आणि नार्को टेस्ट करण्यासाठी अर्ज करणार, असे म्हणत जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर पलटवार केला. मनोज जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.
माझं आणि धनंजय मुंडेचं वैर नाही, त्याने जी घटना करायला नको होती त्याने ती केली आहे, हा चेष्टेचा विषय नाही. त्याने परिस्थिती मर्यादेच्या पुढे नेली, राजकारण आणि आरक्षण एकत्र करण्याची गरज नाही. मला माहिती मिळाली होती मी ती पोलीस प्रशासनाला सांगितली. घातपाताच्या प्रकरणात आठ-दहा जण आहेत, त्यात धनंजय मुंडे पण आहे. त्याप्रकरणाची चौकशी व्हायला नको का? असा प्रश्न जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.
धनंजय मुंडे यांचा धन्या असा एकेरी उल्लेख करत मी तुझ्यासारखा नाही, मी जातवाण आहे, आरोप नाही केले. मी असे खुनाचे, घातपात करण्याचे आरोप नाही करु शकत. नार्को टेस्टला सगळ्यात आधी माझा अर्ज जाईल, तू काय सीबीआयची मागणी करतो? दुसऱ्या मुंडे गटाचे लोक वापरायचे आणि ते तुझेच आहे असं म्हणायचं. धन्या तू आता पक्का गठला, असे म्हणत जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषेद अटकेत असलेले आरोपी आणि धनंजय मुंडे यांच्यात झालेल्या संभाषणाची आॅडिओ क्लिपही ऐकवली.
या क्लिपमधील ते 2 आरोपी आहेत, असेही त्यांनी म्हटलं. तुम्ही पैशांसाठी मुळावर उठता का? समाज इतका कमजोर झाला असं तुम्हाला दाखवायचं का? पण मी समाजासाठी रक्त सांडायला तयार आहे. माझ्यावर संकट आले असताना समाज मला एकटं कसं सोडेल? मी समाजासाठी घर पाहिलं नाही, पोरं पाहिले नाही, असेही जरांगे पाटील म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय गांभीर्याने घ्यावा, असे आवाहन करतानाच धनंजय मुंडेने समाजाच्या आड लपण्याचा प्रयत्न करू नये. मराठा आरक्षणाचा विषय वेगळा आहे, तुम्ही मला संपवायला निघाला आहात, याचा पुनरुच्चारही जरांगे पाटील यांनी केला. मराठ्यांनी मी शांत राहण्याचे आवाहन केले, ते चुकीचे आहे का? आरोपींच्या घरावर हल्ला झाला असेल तर ते चुकीचे आहे, त्यांची शिक्षा घरातल्या लोकांना कशाला? असे सांगत ज्यांनी कोणी हा हल्ला केला असले त्यांनी तो करू नये, असे आवाहन जरांगे पाटील यांनी यावेळी केले.
1. धनंजय मुंडेंनी नेमकं काय आव्हान दिलं होतं?
→ त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना सत्य तपासण्यासाठी ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्टला सामोरे जाण्याचे आव्हान दिले होते.
2. मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय होती?
→ त्यांनी आव्हान तत्काळ स्वीकृत करत स्वतः टेस्टसाठी तयार असल्याचं सांगितलं.
3. हा वाद कोणत्या विषयावरून सुरू झाला?
→ मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोप प्रत्यारोपांवरून हा संघर्ष पेटला.
4. सरकारने यावर काय भूमिका घेतली आहे?
→ सरकारने अद्याप अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही, पण परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.
5. पुढील पाऊल काय असू शकते?
→ दोन्ही नेत्यांच्या निर्णयावरून तपास प्रक्रिया किंवा कायदेशीर कारवाईची मागणी पुढे येऊ शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.