Guardian Minister Dhnanjay Munde
Guardian Minister Dhnanjay Munde Sarkarnama
मराठवाडा

धनंजय मुंडे यांना आली जाग..

सरकारनामा ब्युरो

बीड : कंत्राटदार चाकूचा, कट्यारीचा धाक दाखवून बोगस बिलांवर सह्या घेतात, असा गंभीर आरोप करत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्र देऊन रिव्हाॅल्व्हरची मागणी केली. (Beed) या खळबळजनक आणि बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या प्रकारानंतर अखेर पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhnanjay Munde) यांना जाग आली आहे. (Marathwada)

या प्रकाराची गंभीर दखल घेत मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्याने धमकावणाऱ्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करावी, त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल, असे आश्वासन प्रसिद्धि पत्रकाच्या माध्यमातून दिले आहे. जिल्हा प्रशासनात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या सरकार म्हणून आम्ही सदैव पाठीशी आहोत, असा विश्वासही मुंडे यांनी दिला.

अंबाजोगाईच्या बांधकाम विभागातील अनागोंदी कारभार आणि कंत्राटदारांच्या दहशतीचे उदाहरण नुकतेच समोर आले. `कंत्राटदार धमक्या देऊन, कट्यार दाखवून बिलांवर सह्या घेतात`, असा आरोप खुद्द बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनीच केला. एवढेच नाही तर या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून रिव्हाॅल्व्हरची मागणी देखील केली.

बांधकाम विभागाच्या या लेटरबाॅम्बमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. हा प्रकार समजाताच राज्याचे सामाजिक न्याय व जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी गंभीर दखल घेत संबंधित अभियंत्यांना धमकावणाऱ्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला.

धमकी देण्याचे प्रकार मग संबंधित कोणत्या पक्ष, संघटनेचे असले तरी त्यांची गय केली जाणार नाही. अभियंत्यांनी तक्रार दिल्यास संबंधितांवर निश्चित कठोर कारवाई केली जाईल, असा शब्दही मुंडे यांनी दिला आहे.

अंबाजोगाई सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, संजयकुमार कोकणे यांनी आपल्याला दहशतमुक्त वातावरणात कामकाज करता यावे, तसेच स्वसंरक्षणाच्या हेतूने मला रिल्व्हाॅल्व्हर वापरण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली होती.

सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाईचे कार्यकारी अभियंता म्हणून काही दिवसांपूर्वीच संजयकुमार कोकणे यांची नियुक्ती झाली आहे. कोकणे हे मूळ नाशिकचे रहिवासी आहेत. मात्र त्यांनी अंबाजोगाईत येताच येथील कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली.

येथे देयके अदा करण्याच्या बाबतीत पूर्णतः अनागोंदी असून धमक्या देऊन किंवा कट्यार दाखवून बिले तयार करून आणि मंजूर करून घेतली जातात, असा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित काम करता यावे, यासाठी रिव्हॉल्व्हर द्यावी, असेही पत्रात नमूद केले आहे. या धमकी प्रकरणाची आणि अभियंत्यांनी केलेल्या आरोपाची दखल घेत मुंडे यांनी यात लक्ष घातले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT