Dhanajay Munde, Karuna sharma munde  Sarkarnama
मराठवाडा

Dhanjay Munde vs Karuna Munde : परळीमधून धनंजय मुंडेंविरुद्ध निवडणूक लढविणार; करुणा शर्मा-मुंडेंनी केली घोषणा

Political News : लोकसभेच्या 48 जागांवर आणि विधानसभेच्या 288 जागांवर स्वराज्य शक्ती सेना पक्षाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा करुणा शर्मा-मुंडे यांनी केली.

Sachin Waghmare

Nanded News : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाने सुरू केली आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा स्वराज्य शक्ती सेनेच्या संस्थापक अध्यक्षा करुणा शर्मा-मुंडे यांनी केली आहे. येणाऱ्या लोकसभेच्या 48 जागांवर आणि विधानसभेच्या 288 जागांवर त्यांच्या स्वराज्य शक्ती सेनेच्या पक्षाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार असल्याचे त्यांनी सांगितले.

परळी विधानसभा मतदासंघात धनंजय मुंडे विरुद्ध करुणा शर्मा अशी लढत होणार असल्याची घोषणा स्वराज्य शक्ती सेनेच्या संस्थापक अध्यक्षा करुणा शर्मा-मुंडे यांनी केली. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवण्यासाठी तयारी सुरू केली आहे. करुणा शर्मा-मुंडे यांनी या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्याचा दौरा सुरू केला आहे. गुरुवारी त्या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत बीड येथून प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचे जनस्वराज्य शक्ती सेनेच्या संस्थापक अध्यक्ष करुणा धनंजय मुंडे यांनी बुधवारी धाराशिव येथे जाहीर केले होते. स्वराज्य शक्ती सेना पक्षाच्या वतीने राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता नवनवीन लोकांना राजकारणात संधी देण्यासाठी करुणा मुंडे-शर्मा या सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत.

धाराशिव येथे पत्रकारांशी त्यांनी संवाद साधताना बीडमधून लोकसभा लढवण्याची घोषणा केली होती. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भ्रष्टाचारी पक्ष एकत्र आल्याचे दिसून येते. आणि ते एकत्र येऊन जनतेवर मोठ्या प्रमाणात अन्याय, अत्याचार करीत आहेत. हे बघून मी स्वराज्य शक्ती सेना पक्ष काढलेला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या पक्षाची मी नोंदणी केली असून, मला पक्षाचे नाव मिळाले आहे, लवकरच चिन्हही मिळेल. जर आपल्याला लोकशाही वाचवायची असेल तर खासगीकरण थांबवावे लागेल, असेही त्या म्हणाल्या होत्या.

नांदेडमध्ये बोलताना त्यांनी आगामी काळात होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीची तयारी पूर्ण केली असल्याचे सांगून परळी विधानसभा मतदारसंघात राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhanjay Munde) विरुद्ध करुणा शर्मा अशी लढत पाहावयास मिळणार असल्याचे स्पष्ट केले.

R

SCROLL FOR NEXT