Beed Bazar Samiti Result:  Sarkarnama
मराठवाडा

Bazar Samiti Result: पंकजांना पुन्हा धक्का; परळी, अंबाजोगाईत धनंजय मुंडेंचा डंका...

Beed Bazar Samiti News| बीड जिल्ह्यातील 10 पैकी परळी, केज, गेवराई, पाटोदा-शिरुर, वडवणी, अंबाजोगाई, माजलगाव, कडा, बीड या नऊ बाजार समित्यांवर प्रत्येकी 18 जागांसाठी निवडणूक झाली.

सरकारनामा ब्युरो

Parali, Ambajogai Bazar Samiti Result: बीडमधील परळी वैजनाथ बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलने विजयी आघाडी घेतली आहे. परळी बाजार समितीतील 18 पैकी 11 जागांवर धनंजय मुंडेच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) पॅनल विजयी झालं आहे. सात जागांचा निकाल अद्याप बाकी आहे. हा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना धक्का मानला जात आहे. (Dhananjay Munde's victory in Parli, Ambajogai Bazar Committee)

परळी बाजार समिती निवडणुकीत एकूण 18 उमेदवार उभे होते.आज (२९ एप्रिल) सकाळपासून या बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असून आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वातील पॅनलने 11 जागांवर विजय मिळवला आहे. बाजार समित्यांच्या निवडणुका (Bazar Samiti Election Result) जाहीर झाल्यापासून परळीतील राजकारण चांगलंच तापलं होतं. संपुर्ण परळीचे लक्ष या निकालाकडे लागलं होते.अखेर परळीच्या जनतेने धनंजय मुंडेंच्या बाजूने आपला कौल दिल्याचे दिसत आहे.

दुसरीकडे परळीप्रमाणे अंबाजोगाई बाजार समितीवरही महाविकास आघाडीनेच बाजी मारली आहे. निवडणुकीमध्ये एकूण अठरापैकी तब्बल 15 जागांवर महाविकास आघाडीचा विजय झाला असून भाजपला तीन जागा मिळाल्या आहेत. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या पॅनलने लढवली होती. या निवडणुकीमध्ये मुंडे बहिण-भावाची प्रतिष्ठा पणाला लागल्याने या निवडणुकीकडे जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं.अंबाजोगाईतही जनतेने भाजपला धक्का दिला आहे. तर महाविकास आघाडीने आपले वर्चस्व सिद्ध केलं आहे. निवडणुकीचा निकाल हाती आला असून, भाजपचा पराभव झाला आहे. (Bazar Samiti Election)

बीड जिल्ह्यातील 10 पैकी परळी, केज, गेवराई, पाटोदा-शिरुर, वडवणी, अंबाजोगाई, माजलगाव, कडा, बीड या नऊ बाजार समित्यांवर प्रत्येकी 18 जागांसाठी निवडणूक झाली. त्यापैकी परळी बाजार समितीकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. यानिवडणुकीत धनंजय मुंडे यांच्यासमोर भाजपच्या पंकजा मुंडे यांचे थेट आव्हान होते. पण धनंजय मुंडेंनी परळीत बाजार समितीवर आपली सत्ता तर राखलीच. यासोबतच अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीवरही धनंजय मुंडेंनी झेंडा फडवला आहे. अंबाजोगाई बाजार समितीवर धनंजय मुंडेनी 18 पैकी 15 जागांवर विजय मिळवला आहे. पण पंकजा मुंडे यांच्या पॅननला मात्र तीनच जागांवर समाधान मानाव लागलं आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT