Balasaheb Thorat Sarkarnama
मराठवाडा

EVM opposition : 'EVM'विरोधात रण पेटलं! ‘घोटाळा 100 टक्के’ ठणकावून सांगत थोरात मैदानात!

Dharashiv EVM Protest: Congress Leader Balasaheb Thorat Supports Chhatrapati Sambhajiraje Group : लोकशाही वाचवण्यासाठी ईव्हीएम हटावच्या मागणीसाठी धाराशिव इथं सुरू केलेल्या आंदोलनाला बाळासाहेब थोरात यांनी भेट दिली.

Pradeep Pendhare

Dharashiv EVM protest : लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा, नगरपालिका, महापालिका निवडणुकीत विरोधकांची पिछेहाट सुरू आहे. यातून पुन्हा एकदा ईव्हीएम मशीनबाबत संशय व्यक्त होऊ लागला आहे. धाराशिव इथल्या धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानने ईव्हीएम हटवण्यासाठी बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केलं आहे.

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी या आंदोलनकर्त्यांची भेट घेत, पाठिंबा दिला आहे. याशिवाय विधानसभानंतर विरोधकांची निवडणुकीत एकतर्फा होत असलेल्या पराभवावर चिंता व्यक्त करताना, ईव्हीएममध्ये 100 टक्के घोटाळा असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

राज्यात नगरपालिका, महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा झाली आहे. मात्र, जिल्हा परिषद निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी जोर धरत आहेत. धाराशिव इथल्या धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी काल मुंबईतील राज्य निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कार्यालयात जाऊन, 'ईव्हीएम हटाव देश बचाओ', अशी घोषणाबाजी केल्याने चांगलाच गोंधळ उडाला.

या प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी धाराशिव इथं ईव्हीएम मशीन हटवण्यासाठी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाची आगामी काळात धार वाढण्याची शक्यता आहे. यातच काँग्रेस (Congress) नेते बाळासाहेब थोरात यांनी या आंदोलनाकर्त्यांची भेट घेत, ईव्हीएम मशीनमध्ये नक्कीच घोटाळा आहे, असे म्हणत आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.

बाळासाहेब थोरात म्हणाले, "लोकसभेला महाविकास आघाडीला मोठा विजय मिळाला, महाविकास आघाडीची मोठी संख्या झाली. माञ विधानसभेला, असं काय झालं की, सगळंच बदलून गेलं. निवडणुकीत वेगवेगळे फंडे वापरायचे, ईव्हीएमचा 100 टक्के घोटाळा आहे." पैसाचा वापर करायचा, धर्माचा वापर करायचा, जातीचा वापर करायचा, मतपत्रिकेत घोटाळा एवढं होऊन पुन्हा, ईव्हीएमचा प्राॅब्लम आहेच, असा थोरात यांनी घणाघात केला.

निवडणूक आयोगावर टीका

"मोठ मोठ्या देशात निवडणुकांमध्ये मतपत्रिकेचा वापर होतो. कारण त्यांचा ईव्हीएमवर विश्वास नाही. तरीही सत्ताधारी सत्ता मिळविण्यासाठी ईव्हीएमचा वापर करत आहेत. निवडणूक आयोग, निवडणूक आयोग राहिलेलाच नाही, स्वत: काहीच नाही, त्यांना जे सांगितलं जात तेच करतात, सगळी मनमानीच, हे सगळं मंञालयातून सांगितल जातं," असा गंभीर आरोप थोरातांनी केला.

AIMIM देखील परवडणार नाही

महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर थोरातांनी प्रतिक्रिया देताना, "भाजपने राज्यातील राजकारणाचा चुथडा केला. लोकशाहीची मूल्य, राज्यघटना नष्ट करण्याचे काम भाजप करत आहे.चंदीगड सारखी अनेक उदाहरणे यासाठी देता येतील. राज्यात AIMIM पक्षाला मिळणार यश, हे काँग्रेसचे नुकसान असले, तरी धार्मिक ध्रुवीकरणाचं राजकारण चालू आहे. हे राजकारण हिंदूना परवडणारे नाही अन् AIMIM देखील परवडणार नाही."

थोरातांचा ठाकरेंच्या मुद्याला पाठिंबा

ईव्हीएम हटावच्या मुद्द्याला राज ठाकरे यांनी, पाठिंबा देत लोकशाही वाचवायचे असेल, तर हा मुद्दा कोण घेते, कोणता पक्ष घेतो आहे, हे महत्त्वाचं नसून, मुद्दा महत्त्वाचा आहे, असे म्हणत बाळासाहेब थोरात यांनी राज ठाकरेच्या मुद्द्याला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दर्शवला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT