MP Omraje Nimbalkar News  Sarkarnama
मराठवाडा

Omraje Nimbalkar News : शिवभक्त तरुणांवर पोलीसांच्या लाठ्या, ओमराजे म्हणाले हेच का तुमचे हिंदुत्व..!

Jagdish Pansare

Dharashiv News : राज्यात तुमचे हिंदुत्व श्रेष्ठ की आमचे? यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सध्या जोरदार स्पर्धा लागलेली आहे. अशातच मंगळवारी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती राज्यात साजरी झाली.

धाराशिवमध्ये या निमित्ताने मिरवणूक काढण्यात आली होती. परंतु या दरम्यान, पोलिसांनी मिरवणूकीतील काही शिवभक्त तरूणांना लाठ्यांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला.

नेमका पोलीस आणि शिवभक्तांमध्ये काय वाद झाला, पोलिसांनी टोकाची भूमिका का घेतली? ही प्रश्न अनुत्तरित असली तरी या लाठी हल्ल्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांनी संताप व्यक्त केला आहे. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या सरकारचे हेच का तुमचे हिंदुत्व? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवभंक्तावर पोलीसांकडून झालेल्या लाठीहल्ल्यामुळे धाराशिवमध्ये संतापाचे वातावरण आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तातडीने या घटनेची दखल घेत संबंधित पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई, करावी तसेच स्वतः गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी ओमराजे यांनी केली आहे. हेच का तुमचे हिंदुत्व, अशी विचारणा करत ओमराजे यांनी या लाठीहल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आपल्या धाराशिव शहरामध्ये मंगळवारी मिरवणुका निघाल्या होत्या. या मिरवणुकी दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांकडून शिवभक्त तरुणांवर लाठीचार्ज करण्यात आला. ही बाब अत्यंत निंदनीय असून याचा मी जाहीर निषेध करतो. या घटनेला राज्याचे गृहमंत्रालय जबाबदार असून दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी.

यापूर्वीही आळंदी येथे वारकऱ्यांवर पोलिसांनी (Police) लाठीमार केला होता. नंतर आंतरवली सराटी येथेही निष्पाप मराठा बंधू, माता-भगिनीवर असा लाठीचार्ज करण्यात आला. महाराष्ट्रात सध्या फक्त आणि फक्त हुकूमशाही चालू आहे. महाराष्ट्राची कायदा व सुव्यवस्था हाताळता न येणाऱ्या गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशा शब्दात ओमराजे निंबाळकर यांनी राग व्यक्त केला.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT