Omraje Nimbalkar Sarkarnama
मराठवाडा

Dharashiv Politics : ठाकरेंचे नगरसेवक शिंदेंसेनेत जाताच ओमराजेंवर त्यांचाच भावाचा खळबजनक आरोप, 'एक कोटींचा गद्दार' बॅनरमुळे राजकारण तापलं!

Dharashiv Shivsena politics : नगरसेवकांच्या पक्षांतरानंतर धाराशिव शहरात त्यांच्या विरोधात बॅनर झळकले आहेत. ‘एक कोटींचा गद्दार हा शिक्का पुसायचा नाही’, ‘मतदाराला धोका, आमचं मत आम्हाला परत द्या’ अशा आशयाचे बॅनर शहरात लावण्यात आले आहेत. त्यामुळे नगरसेवकांच्या पक्षांतराचा मुद्दा आता थेट जनतेमध्ये पोहोचला आहे.

Jagdish Patil

Dharashiv News, 18 Aug : खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची साथ सोडल्यानंतर धाराशिवमधील राजकीय समीकरणांना वेगाने कलाटणी मिळताना दिसत आहे. त्यातच आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे धाराशिव नगर परिषदेतील पाच नगरसेवक शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाल्याने ठाकरे गट आक्रमक झाला आहे. नगरसेवकांच्या या पक्षांतरावरून धाराशिवच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.

धाराशिव नगर परिषदेतील ठाकरे गटाच्या पाच नगरसेवकांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर ठाकरे गटाने नगरसेवकांच्या फोडाफोडीवर गंभीर आरोप केले आहेत. नगरसेवकांना पैशांचे आमिष दाखवून फोडले जात असून मोठा घोडेबाजार सुरू असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे पक्षाचे सहसंपर्कप्रमुख तथा ओमराजे निंबाळकर यांचे बंधू मकरंद राजे निंबाळकर यांनी केला आहे.

नगरसेवकांच्या फोडाफोडीसाठी २० लाखांपासून तब्बल एक कोटी रुपयांपर्यंत बोली लावली जात असल्याचा आरोप मकरंद राजे निंबाळकर यांनी केला. तसेच ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह पाटील यांनी नगरसेवक फोडाफोडीचा बाजार मांडल्याचा घणाघातही त्यांनी केला.

दरम्यान, नगरसेवकांच्या पक्षांतरानंतर धाराशिव शहरात त्यांच्या विरोधात बॅनर झळकले आहेत. ‘एक कोटींचा गद्दार हा शिक्का पुसायचा नाही’, ‘मतदाराला धोका, आमचं मत आम्हाला परत द्या’ अशा आशयाचे बॅनर शहरात लावण्यात आले आहेत. त्यामुळे नगरसेवकांच्या पक्षांतराचा मुद्दा आता थेट जनतेमध्ये पोहोचला आहे.

‘दम होता तर राजीनामा घ्यायचा’

नगरसेवक फोडाफोडीनंतर ठाकरे गटाच्या वतीने बैठक घेण्यात आली. या बैठकीत शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेत पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांसह ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर निशाणा साधला. “मशाल चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांचा राजीनामा घ्यायचा आणि त्यांना पुन्हा निवडून आणायचं. नगरसेवकांची केलेली फोडाफोडी खपवून घेतली जाणार नाही. येत्या काळात त्यांना धडा शिकवू,” असा इशारा ठाकरे गटाकडून देण्यात आला.

धाराशिवमध्ये राजकीय संघर्ष तीव्र होण्याची शक्यता

ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेनंतर धाराशिवमधील राजकीय समीकरणे बदलली असतानाच आता नगरसेवकांच्या पक्षांतरामुळे ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेतील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. एकीकडे नगरसेवकांच्या पक्षप्रवेशामुळे शिंदेंच्या शिवसेनेची स्थानिक पातळीवरील ताकद वाढत असल्याचे चित्र आहे, तर दुसरीकडे ठाकरेंच्या समर्थकांनी या पक्षांतराला आक्रमकपणे विरोध करण्यास सुरुवात केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT