Latur News : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी धीरज देशमुख तर उपाध्यक्षपदी अविनाश बाळासाहेबजी जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलला बहुमत मिळाले होते. 19 पैकी 15 जागांवर 'सहकार'ने मिळवल्या होत्या.
गेली पाच वर्ष धीरज देशमुख यांच्याकडेच जिल्हा बँकेचे अध्यक्षपद होते. आता दुसऱ्यांदा त्यांच्याकडे अध्यक्षपद आले आहे.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी धीरज देशमुख यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला होता. भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या पत्नी शोभा पवार या देखील सहकार पॅनलसोबत होत्या. त्यांची निवड बिनविरोध झाली होती.
देशमुख यांच्या विरोधात भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार बसवराज पाटील, आमदार संजय बनसोडे, आमदार रमेश कराड यांनी परिवर्तन पॅनलले उभे करून आव्हान उभे केले होते. मात्र, निवडणुकीत सहकार पॅनलले मोठा विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली होती.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत मिळालेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित संचालकांनी शिष्टमंडळाने मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावेळी लातूर जिल्हा बँकेतील आजपर्यंत सुरू असलेला कथित गैरकारभार थांबवून बँकेत पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार सुरू करण्यासह जिल्ह्यातील सहकार क्षेत्र अधिक समृद्ध करण्याची ग्वाही शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.