Mla Dhiraj Deshmukh-Sambhajipatil Nilangekar Sarkarnama
मराठवाडा

Dhiraj Deshmukh : आमचा नाद करायचा नाही, आम्ही करेक्ट कार्यक्रम करतो...

आम्ही विकासाचे राजकारण करतो, आम्ही शांत आहोत शांतच राहु द्या. उगाच आमचा नाद केला तर तुम्हाला सोडणार नाही. (Dhiraj Deshmukh)

राम काळगे

निलंगा : काँग्रेस आहे, चाललत राहते, शांत आहे, पण यापुढे असे चालणार नाही. आम्ही जोपर्यंत शांत आहोत तो पर्यंत राहू द्या, विकासाच्या आड याल तर तुमचा करेक्ट कार्यक्रम करू. आमचा नाद करायचा नाही. (Latur) वैद्यकीय शिक्षण खाते आमच्याकडे असल्यामुळे इंजेक्शन कधी व कुठे द्यायचे आम्हाला पक्के माहीत आहे, असा टोला काॅंग्रेसचे आमदार धिरज देशमुख (Dhiraj Deshmukh) यांनी माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhajipatil Nilangekar) यांना लगावला.

निलंगा येथील कार्यक्रमात आमदार धिरज देशमुख यांनी तुफान टोलेबाजी करत निलंगेकरांना नाव न घेता सुनावले. निलंगा येथील शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर चालवण्यासाठी ट्वेंटीवन शुगर मिलने घेतला आहे. या कारखाण्याच्या मशनरीचे पूजन अमित देशमुख यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते.

जिल्ह्यातील शिल्लक ऊसाच्या प्रश्नावरून संभाजी पाटील निलंगेकर यांनी पालकमंत्री अमित देशमुख यांच्यावर टीका केली होती. देशमुख यांनी या टीकेला थेट निलंगेकर यांच्या आजोबांच्या नावाने असलेला साखर कारखाना चालवायला घेत दिले. अमित देशमुख यांच्या उपस्थितीत त्यांचे बंधू आमदार धिरज देशमुख यांनी देखील आलेल्या संधीचा फायदा घेत संभाजी पाटील यांच्यावर निशाणा साधला.

ते म्हणाले, जिल्ह्यातील कारखान्यांनी आतापर्यंत ४४ लाख टन ऊसाचे गाळप केले आहे. यातून शेतकऱ्यांना ९६८ कोटी रूपये बिलापोटी दिले आहेत. आम्ही विकासाचे राजकारण करतो, आम्ही शांत आहोत शांतच राहु द्या. उगाच आमचा नाद केला तर तुम्हाला सोडणार नाही. आज शेतकऱ्यांच्या नववर्षाची सुरवात असून हा कारखाना सुरू करावा अशी अनेक वर्षाची मागणी होती.

माजी पालकमंत्र्यांनी कारखाना चालू करावा अशी मागणी केली होती. मात्र विद्दमान पालकमंत्र्यांनी हा कारखाना चालू केला, हा दोन व्यक्ती मधील फरक आहे. शेतकऱ्यांची स्वप्नपुर्ती करण्यासाठी कारखाने चालू केले पाहिते. मांजरा परिवारात आलेले सर्व कारखाने पूर्ण क्षमतेने चालवू ऊसाला रास्त भाव देऊ, आर्थिक समृद्धी आता या अंबुलगा परिसरात करायची आहे. अंबुलगा कारखान्याला सुध्दा लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक मदत करेल, अशी ग्वाही देखील धिरज देशमुख यांनी उपस्थितांना दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT