Dhnajay Munde On Raj Thackeray, Dhnajay Munde Latest News
Dhnajay Munde On Raj Thackeray, Dhnajay Munde Latest News Sarkarnama
मराठवाडा

Dhnanjay Munde : एकदा समोरासमोर या, कोण किती जातीयवादी हे महाराष्ट्राला कळेल..

सरकारनामा ब्युरो

बीड : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी औरंगाबादेत झालेल्या जाहीर सभेतून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा जातीयवादाचा आरोप केला. (Beed) यावर राष्ट्रवादीकडून प्रतिक्रिया उमटायला लागल्या आहेत. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhnanjay Munde) यांनी राज ठाकरे यांना एकदा समोरासमोर या आणि महाराष्ट्रातील जनतेला कळू द्या, जातीयवादी कोण ? असे आव्हानच दिले. (Dhnajay Munde On Raj Thackeray)

बीडमध्ये राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेतील आरोपावर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. मुंडे म्हणाले, राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात उपस्थित केलेल्या भोंग्याच्या मुद्यापेक्षा बेरोजगारांचा प्रश्न महत्वाचा आहे. (Marathwada) भोंगे लावले किंवा काढले तरी त्याने आजच्या तरुणांना भाकरी मिळणार आहे का? त्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे का ? तर नाही. मनसे केवळ जातीजातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत.

भोंग्याचा विषय हाती घेऊन जर महाराष्ट्र प्रगत होणार असेल तर त्यांची भूमिका योग्य म्हणता येईल. परंतु पुरोगामी महाराष्ट्रात आतापर्यंत जे घडले नाही ते घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पवार साहेबांवर जातीयवादाचा करण्यात आलेला आरोप चुकीचा आणि दिशाभूल करणारा आहे. पवार साहेबांनी कधीच जातपात मानली नाही.

त्यामुळे कुणाच्या आरोपांनी काही परिस्थिती बदलत नाही. एकदा समोरासमोर बसू, मग महाराष्ट्रातल्या जनतेला कळेल की कोण किती जातीयवादी आहे? असा टोला देखील मुंडे यांनी लगावला. राज ठाकरे यांच्या सभेपुर्वी परभणीत बोलातंना देखील ईडी मागे लागल्यामुळेच राज ठाकरेंचा भोंगा जोरात वाजतोय, अशी टीका केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT