Let.Gopinath Munde-Minister Dhnanjay Munde
Let.Gopinath Munde-Minister Dhnanjay Munde Sarkarnama
मराठवाडा

Dhnanjay Munde : अप्पा तुमच्या नावापुढे स्वर्गीय लावावे लागेल, असे कधी वाटले नव्हते..

सरकारनामा ब्युरो

परळी : राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड व परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhnanjay Munde) हे शुक्रवारी (ता.३ ) रोजी सकाळी अकरा वाजता परळी (Parali) तालुक्यातील गोपीनाथगड (पांगरी) येथे लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यासाठी हेलिकॉप्टरने जाणार आहेत.

गोपीनाथ मुंडे यांच्या सान्निध्यात राजकीय जीवनाला सुरुवात केलेले धनंजय मुंडे गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय व कौटुंबिक वाटचालीतील एक अविभाज्य घटक मानले जातात. (Marathwada) नात्याने चुलते असलेल्या स्व. गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांना धनंजय अप्पा म्हणत.

अप्पा, तुमच्या नावापुढे स्वर्गीय शब्द लावावा लागेल, तुमचा जन्मदिवस जयंती म्हणून साजरा करावा लागेल, असे कधीच वाटले नव्हते, ईश्वराने आम्हा सर्वांवर ही कठोर वेळ आणली, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

दरम्यान गोपीनाथगड येथील स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिस्थळी धनंजय मुंडे सकाळी अभिवादन करण्यासाठी हेलिकॉप्टरने जाणार आहेत. त्यानंतर ते जामखेड जिल्हा अहमदनगर येथे गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित आदरांजली कार्यक्रमास देखील उपस्थित राहणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT