ACP Dhume News, Aurangabad
ACP Dhume News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

ACP Dhume News : दारू पिऊन धिंगाणा घालण्याची ढुमेंची जुनीच सवय, नगरमध्येही झाल्या होत्या तक्रारी..

सरकारनामा ब्युरो

Marathwada News: एसीपी विशाल ढुमे यांनी महिलेची छेड काढून विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली. विशेष म्हणजे महिलेशी गैरवर्तन केल्यानंतर देखील ढुमे (Vishal Dhume) यांच्यावर पोलिस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत होते.

दबाव वाढल्यानंतर गुन्हा दाखल झाला, पण त्यात ढुमेंवर जामीन मिळतील अशी कलमे लावली. घडलेही तसेच आधी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी आणि चार तासांत जामीन. (Aurangabad) त्यामुळे ढुमेंच्या निलंबनासाठी आता राजकीय पक्ष, सामाजिक संघटना देखील आक्रमक झाल्या आहेत. (Crime News)

ढुमे यांचे दारू पिवून धिंगाणा घालणे, शिवीगाळ, मारहाण हे प्रकार काही नवे नाही. नगर येथे पोलिस उपअधिक्षक असतांना गेल्यावर्षी अशाच प्रकारांमुळे त्यांची बदली करण्यात आली होती. दारू पिवून नागरिकांना त्रास, शिवीगाळ केल्याप्रकरणी देखील ढुमे यांची खातेनिहाय चौकशी करण्यात आली होती.

ढुमे नगर येथे पोलिस उपअधिक्षक म्हणून कार्यरत होते. तेव्हा त्यांच्याकडे कोतवाली, तोफखानासह शहरतील इतर चार पोलिस स्टेशनचा भार होता. तेव्हा देखील दारू पिवून लोकांना त्रास दिल्या प्रकरणी त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रारी करण्यात आल्या होत्या.

तेव्हा त्याची खातेनिहाय चौकशी करण्याची शिफारस तत्कालीन डीसीपींनी वरिष्ठांकडे केली होती. ही चौकशी सुरू असतांनाच ढुमे यांची औरंगाबादला बदली करण्यात आली होती. परंतु ढुमे यांनी काही धडा घेतल्याचे दिसत नाही. औरंगाबादेत देखील त्यांचे गैरवर्तन सुरूच असल्याचे विनयभंगाच्या प्रकरणावरून समोर आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT