Sandeep Kshirsagar Latest News Sarkarnama
मराठवाडा

Sandeep Kshirsagar News : अग्रिम पीकविम्याची मंजूर रक्कम शेतकऱ्यांना द्या; बीडचे आमदार क्षीरसागर आक्रमक

Beed Political News : या हंगामातील पिकांचे खूप मोठे नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट...

Deepak Kulkarni

Beed Political News : बीड जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक आधाराची गरज आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २५ टक्के पीकविमा अग्रिम मंजूर झाला. मंजूर झालेली विमा अग्रिमची रक्कम शेतकऱ्यांना तत्काळ वितरीत करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली.

जिल्ह्यात मागच्या दीड महिन्यात पावसाने चांगलीच ओढ दिली. त्यामुळे खरिपातील साडेसात लाख हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, जिल्ह्यात सर्वत्र पावसाअभावी व अतिवृष्टीने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे.

अगोदर पावसाच्या अभावाने पिके करपली आणि नंतर अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले आहे. या हंगामातील पिकांचे खूप मोठे नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट आले आहे.(Farmer News)

आमदार संदीप क्षीरसागर(Sandeep Kshirsagar) म्हणाले, शेतकऱ्यांना मदतीची गरज असल्याने आपण सातत्याने पाठपुरावा केला. जिल्हा प्रशासनाकडून तीन टप्प्यांत जिल्ह्यातील ८६ मंडळांतील सोयाबीन पिकासाठी २५ टक्के अग्रिम पीकविमा मंजूर करण्यात आला, परंतु अद्यापपर्यंत अग्रिम पीकविम्याची रक्कम वितरीत करण्याबाबत कार्यवाही सुरू झालेली नाही.(Latest Marathi News)

या मुद्द्यावर क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री, मुख्य सचिव, विभागीय आयुक्त, कृषी आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी यांच्याकडे याबाबत पत्रव्यवहार केला आहे. अग्रिम पीकविम्याची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT