Mla Ambadas Danve News Aurangabad
Mla Ambadas Danve News Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

जिल्हाप्रमुख, राज्य प्रवक्ते ते आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ; दानवेंचा चढता आलेख..

जगदीश पानसरे

औरंगाबाद : राज्याच्या राजकारणात औरंगाबादचे महत्व वाढत आहे. यापुर्वी भाजपचे हरिभाऊ बागडे यांना विधानसभा अध्यक्ष पद भूषवण्याचा बहुमान मिळाला होता. (Shivsena) त्यानंतर आता विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदी शिवसेनेचे आमदार तथा प्रवक्ते अंबादास दानवे यांची निवड केली जाणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Marathwada) यांनी दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असून तसे पत्र उपसभापती डाॅ. निलम गोऱ्हे यांना देण्यात आले आहे.

अंबादास दानवे यांनी स्वतः आपल्या नावावर पक्षाकडून शिक्कामोर्तब झाल्याची माहिती `सरकारनामा`शी बोलतांना दिली. (Aurangabad) औरंगाबादच्या राजकीय इतिहासातील ही एक मोठी घटना समजली जाते. राज्यातील सत्तांतरानंतर विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदी राष्ट्रवादीचे अजित पवार यांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेते पदावर शिवसेनेकडून दावा केला जाणार हे जवळपास निश्चित होते.

त्यानूसार आज शिवसेनेच्या वतीने विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. निलम गोऱ्हे यांना अंबादास दानवे यांची विरोधी पक्षनेते पदी निवड करण्या संदर्भातील पत्र देण्यात आले आहे. अंबादास दानवे हे गेल्या २५ वर्षापासून शिवसेनेत कार्यरत आहेत. संघटन कौशल्य, वक्तृत्व आणि पक्षाची ध्येय, धोरण तळागाळापर्यंत पोहचवणारी यंत्रणा हाताळण्याचे कसब या जोरावर अंबादास दानवे यांनी पक्षात मानाची पद मिळवली.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू अशी ओळख असलेले दानवे हे सर्वाधिक काळ जिल्हाप्रमुख राहिलेले नेते म्हणून देखील ओळखले जातात. भाजपमधून शिवसेनेत आलेल्या दानवे यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर पक्षात आपले भक्कम असे स्थान निर्माण केले. जिल्हाप्रमुख, विधान परिषद सदस्य, राज्य प्रवक्ते अशा तिहेरी भूमिकेत सध्या दानवे आहेत. जिल्ह्यातील संघटना बांधणी आणि ती एकसंध ठेवण्यात अंबादास दानवे यांची मोठी भूमिका राहिलेली आहे.

उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कामाचा आणि अनुभवाचा विचार करूनच त्यांना विधान परिषदेवर संधी दिली होती. तिथेही संधी मिळेल तेव्हा दानवे यांनी शहर ते राज्य पातळीवरच्या अनेक विषयांना वाचा फोडली. मुद्देसूद मांडणी, पक्षाची ध्येय, धोरण याला कुठेही तडा न जाता विरोधकांना उत्तर देण्याचे कसब या गुण वैशिष्टांमुळेच उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर राज्य प्रवक्ते पदाची जबाबदारी दिली होती. आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद बहाल करत दानवे यांच्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT