District Collector Vist Affected Farm News Sarkarnama
मराठवाडा

District Collector News : नुकसानीच्या पंचनाम्यावर संपाचा परिणाम होणार नाही..

सरकारनामा ब्युरो

Chhatrapati Sambhajinagar : जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यातील सरकारी कर्मचारी संपावर आहेत. परंतु याचा कुठलाही परिणाम गारपाठ आणि अवकळी पावसामुळे (Farmers) शेतकऱ्यांच्या पीक आणि फळबागांच्या नुकसानीच्या पंचनाम्यावर होणार नाही. बदली कर्मचारी देवून तातडीने हे पंचनामे पुर्ण केले जातील, असे आश्वासन जिल्हाधिकारी आस्तीककुमार पांडेय यांनी दिले.

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. (Collector) राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. (Aurangabad) जे कर्मचारी संपावर आहेत त्यांच्या जागेवर पर्यायी कर्मचारी देऊन पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. जिल्ह्यातील काही भागात ६,७,१६ आणि १७ मार्च रोजी अवकाळी पाऊस झाला.

या पावसामुळे गहू, हरभरा, ज्वारी, मोसंबी, डाळींब तसेच भाजीपाला पिकाचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी या भागाचा दौरा केला. त्यांनी शेकट्या जवळील वाहेगाव देमणी या भागात जाऊन बळवंत तांगडे या बळीराजाच्या शेतात पिकाची पाहणी केली. जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यभरात सरकारी कर्मचारी संपावर आहेत. त्याचा परिणाम नुकसानीच्या पंचनामे करण्यावर होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या.

यावर बदली कर्मचाऱ्यांकडून हे पंचनामे तातडीने पुर्ण केले जातील, असे पांडेय यांनी स्पष्ट केले. यावेळी उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रकाश देशमुख, तहसीलदार ज्योती पवार, अपर तहसीलदार विजय चव्हाण यांच्यासह जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT