District Court News Sarkarnama
मराठवाडा

District Court News : माजी जिल्हा परिषद अध्यक्षाला मारहाण प्रकरणात शिक्षा..

Marathwada : आरोपी राजेंद्र ठोंबरे यांनी डॉक्टरांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात फुलंब्री पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल आहे.

सरकारनामा ब्युरो

Chhatrapati Sambhajinagar : फुलंब्रीच्‍या ग्रामीण रुग्णलयातील तत्कालीन वैद्यकिय अधिकाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी माजी जिल्हा परिषद अध्‍यक्ष राजेंद्र ठोंबरे (Rajdendra Thombre) यांना कोर्ट उठेपर्यंत शिक्षा आणि विविध कलमाखांली २१ हजारांचा दंड जिल्हा व सत्र न्‍यायाधीश डी. एच. केळुसकर यांनी ठोठावला.

फुलंब्रीच्‍या ग्रामीण रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकिय अधिकारी श‍शिकांत कुशबा पट्टेकर यांनी या प्रकरणात फिर्याद दिली होती. (Aurangabad) त्‍यानूसार १७ ऑगस्‍ट २००९ रोजी दुपारच्‍या वेळी मनोज तुकाराम चिकटे हे रुग्णालयात श्रावण बाळ योजने संबंधीची फाईल घेवून आले, व त्यांनी फाईल मधील लोकांचे वयाच्या दाखल्यांची मागणी केली. (Marathwada)

मात्र ते दाखले न दिल्याने मनोजने फिर्यादी डॉक्टरांशी हुज्जत घातली. त्‍यानंतर त्याठिकाणी आलेले आरोपी राजेंद्र ठोंबरे यांनी डॉक्टरांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात फुलंब्री पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल आहे. तपास अधिकारी तत्‍कालीन उपाधिकक्षक पी. पी. शेळके यांनी न्‍यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

खटल्याच्या सुनावणीत सहायक लोकाभियोक्ता अजित अंकुश यांनी आठ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. विशेष म्हणजे त्‍यातील चार साक्षीदार फितूर झाले. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपी ठोंबरेंना दोषी ठरवून भादंवी कलम ३५३ अन्‍वये कोर्ट उठेपर्यंत शिक्षा आणि २० हजार रुपये दंड, कलम १८६ आणि कलम ५०६ अन्‍वये कोर्ट उठेपर्यंत शिक्षा आणि प्रत्‍येकी ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT