Bombay High Court Bench Aurangabd, News
Bombay High Court Bench Aurangabd, News Sarkarnama
मराठवाडा

High Court News : विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केले, पण खंडपीठाच्या आदेशाने सरपंचपद कायम..

सरकारनामा ब्युरो

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर: कन्नड तालुक्यातील नागदच्या सरपंचपदी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या (High Court) आदेशामुळे राजधर अहिरे यांची नियुक्ती निश्चित झाली आहे. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांचा अपात्रतेचा आदेश न्या. अरुण पेडणेकर यांनी रद्द ठरविला होता. खंडपीठाच्या अंतिम निकाल नागदच्या सरपंचपदासंबंधीचा वाद अधिन राहील असे यापूर्वीच्या सुनावणीत स्पष्ट केले होते.

स्थानिक आमदारांनी ग्रामपंचायतीची निवडणूक प्रतिष्ठेची बनविली होती. (Kannad) डॉ. दिलीपसिंह राजपूत आणि माजी आमदार नितीन पाटील यांच्या पॅनलने निवडणूक जिंकल्याने घाव जिव्हारी लागला होता. (Aurangabad) सरपंच राजधर अहिरे व सदस्य शोभाबाई अहिरे यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याची तक्रार विष्णू ससाणे यांनी दिल्यानंतर औरंगाबादचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांनी दोघांचे सदस्यपद रद्द केले होते.

दोघांनी अॅड. सिद्धेश्वर ठोंबरे मार्फत खंडपीठात याचिका दाखल केली होती. राजधर यांचे काका पोपटराव आणि शोभाबाई याचे सासरे सुखदेव अहिरे यांना १९७५ मध्ये भुमिहीन असल्यामुळे राज्यशासनाने इंदिरा आवास योजनेत घरकूल बांधण्यास २८ हजार अनुदान मंजूर केले होते. संबंधित बाब जिल्हाधिकारी आणि आयुक्तांनी विचारात घेतली नाही.

भुमी अभिलेख विभागाच्या अधीक्षकांनी केलेल्या पंचनाम्यात ग्रामपंचायत रेकॉर्डनुसार एकाच मालमत्तेला वेगवेगळे नंबर पडल्याचे म्हटले आहे. दोघांनी खंडपीठात धाव घेतल्यानंतर ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली होती. त्यावेळी खंडपीठाने संबंधित निवडणूक खंडपीठाच्या निर्णयास अधिन राहील असे स्पष्ट केले होते.

त्यामुळे राजधर अहिरे यांचा सरपंच होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कन्नड तालुक्यात नागद मोठी ग्रामपंचायत असून विद्यमान आमदाराचे गाव आहे. राजकारणात नवख्या असलेल्या डॉ. दिलीपसिंह राजपूत यांच्या पॅनलकडून गावातच पराभव झाल्याने आमदाराचा राग होता. ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले. जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांपर्यंत त्यांना यश मिळाले. परंतु खंडपीठात निकाल विरोधात गेला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT