Bjp Mla Prashant Bamb Sarkarnama
मराठवाडा

शेतकऱ्यांची वीज कट करू नका; भाजप आमदाराने दिला महावितरणला हा प्रस्ताव..

(Bjp Mla Prashant Bamb Appeal Farmers) ज्या शेतकऱ्यांच्या शेतात कृषीपंप आहे, त्यांनी हाॅर्सपावरच्या क्षमतेनूसार दोन ते दहा हजार रुपये भरण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन प्रशांत बंब यांनी केले आहे.

जगदीश पानसरे

औरंगाबाद ः जिल्ह्यात वीज बील थकबाकी वसुलीसाठी महावितरण कंपनीकडून गावागावात जाऊन शेतकऱ्यांची वीज कट केली जात आहे. डीपी, रोहित्र बंद केली जात असल्याने आधीच संकटात सापडलेला शेतकरी आणखी अडचणीत येणार आहे. यावर भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी महावितरण कंपनीला एक प्रस्ताव दिला आहे.

त्यानूसार ज्या शेतकऱ्याकडे दोन, तीन, पाच, सात व दहा हाॅर्सपावरची मोटार आहे, ते प्रत्येकी दोन, तीन, पाच, सात व दहा हजार रुपये भरतील. अतिवृष्टीमुळे शेतकरी पुर्णपणे उद्धवस्त झाला आहे. त्याच्या पीकांचे, शेतजमीनीचे नुकसान तर झालेच पण तो मानसिकरित्या देखील खचला होता. यातून बाहेर पडत त्याने पुन्हा उभे राहण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

शेतातील पीक जगवण्याचे मोठे आव्हान त्याच्या समोर असतांना महावितरणकडून वीजबील थकबाकीचा तगादा आणि कनेक्शन कट करण्याचा सपाटा सुरू आहे. अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने दहा हजार रुपये हेक्टरी म्हणजेच शंभर रुपये गुंठा अशी मदत देऊ केली आहे. एवढ्या कमी पैशात शेतकरी वीज बील कुठून भरणार हा खरा प्रश्न आहे.

पण महावितरणची सक्तीची वसूली, डीपी, रोहित्र बंद करण्याची कारवाई पाहता आहे त्या पीकांचे नुकसान नको, म्हणून आम्ही मध्यम मार्ग स्वीकारला आहे. त्यानूसार ज्या शेतकऱ्यांच्या शेतात कृषीपंप आहे, त्यांनी हाॅर्सपावरच्या क्षमते नूसार दोन ते दहा हजार रुपये भरण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन प्रशांत बंब यांनी केले आहे.

तसा प्रस्ताव देखील बंब यांनी महावितरणकडे दिला आहे. येत्या शुक्रवार, शनिवारपर्यंत महावितरणच्या निर्णयाची वाट पाहू, त्यांनी प्रस्ताव मान्य करावा, अशी आमची विनंती आहे. अन्यथा महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालक कार्यालयावर मोर्चा काढू, असा इशारा देखील बंब यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT