Dr.Bhagwat Karad-Raj Thackeray
Dr.Bhagwat Karad-Raj Thackeray Sarkarnama
मराठवाडा

Dr. Karad : राज ठाकरेंना मत मांडण्याचा हक्क, आतापर्यंत सभेला परवानगी द्यायला हवी होती..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : एक मे रोजी मनसेची सभा होणार आहे. या सभेस अद्यापही पोलिसांकडून परवानगी मिळालेली नाही, या सभेस भाजप (Bjp) पाठिंबा देत सहभागी होणार का असा प्रश्‍न प्रसार माध्यमांनी विचारल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्राकांत पाटील आणि विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितल्यानंतर मनसेच्या सभेस पाठिंबा देऊ, अशी प्रतिक्रीया केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना दिली.

कराड म्हणाले, प्रत्येक पक्षाला आपले मत मांडण्याचा हक्क आहे. यामुळे आतापर्यंत परवानगी मिळायला पाहिजे होती. मनसे (Raj Thackeray) सोबत युती विषयी अद्यापही काहीच ठरलेले नाही, या विषयावर प्रदेश पातळीवरून निर्णय होईल. कायदा व सुव्यवस्था ठेवणे हे सरकारचे काम आहे, हे काम पोलिसांनी करावे. (Marathwada)

औरंगाबाद महापालिकेसाठी निवडणुक प्रमुख म्हणून माझ्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकी संदर्भात आम्ही रणनिती आखणार आहोत. राज ठाकरेंच्या सभेला पाठिंबा देण्याविषयीची भूमिका जाणून घेण्यासाठी प्रदेशाध्यक्षांना कळवले आहे. त्यांना विचारूनच या संदर्भात काय तो निर्णय होईल, असेही कराड यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेने शहरात काय विकास कामे केली आहेत, हे जनतेला माहिती आहे. पाणी कधी येते हे आपण पाहतोच. त्यामुळे लोकांना आता विकास पाहीजे आहे. नागरिकांना चांगल्या मुलभूत सुविधा देता याव्यात यासाठी आगामी माहापालिका निवडणुकीत भाजप दणदणीत यश मिळवून सत्ता आपल्या ताब्यात घेईल, असा दावा देखील कराड यांनी केला.

मी खासदार आणि नंतर मंत्री झाल्यापासून शहराचा विकास करून दाखवला आहे. दोन तीन मोठे प्रकल्प शहरात आणल्यामुळे नागरिकांना चांगल्या सेवा देता येणार आहेत. निवडणुकीत कुणासोबत युती करणार या संदर्भात निर्णय हा प्रदेशाध्यक्ष व प्रदेश पातळीवरून घेण्यात येईल, असेही कराड यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT