नायगाव : कॉंग्रेसमध्ये 'नेता संस्कृती' आहे असे म्हटले जात होते आणि हे ज्येष्ठ नेते युवक कार्यकर्ते, पदाधिकारी यांना गृहित धरत नव्हते. पण, आता राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेमुळे हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. पक्ष युवकांचा विचार करत आहे. निर्णय प्रक्रियेत त्यांना सहभागी करून घेतले जात आहे. पक्षाशी संबंधित काही असेल तर युवक कॉंग्रेसचेही मत विचारात घेतले जात आहे. या यात्रेतून हा बदल जाणवला, असा प्रातिनिधिक सूर होता तो पक्षाच्या युवा नेते, कार्यकर्ते यांचा.
या उपक्रमामुळे अनेक युवक पक्षासोबत जुळले. कुणीतरी आपल्या समस्या घेऊन लढतेय, भिडतेय हे आता लोकांना कळत आहे. (Congress) त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच बदल दिसेल. मोदी सरकार भांडवलदारांचे सरकार आहे. (Rahul Gandhi) राहुल गांधी सर्व सामान्यांत जाऊन त्यांचे प्रश्न ऐकून घेत आहेत. काल तर त्यांनी अनपेक्षितपणे एका शेतकऱ्याच्या घरात जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले, अशी प्रतिक्रिया युवक काॅंग्रेसचे राज्य सचिव अनिकेत नवले यांनी दिली आहे.
तर देशाला काॅंग्रेसच्या विचारांची गरज असल्याचे सांगत एनएसयूआयच्या प्रदेश महासचिव रुकसाना पाटील म्हणाल्या, भाजपचे राजकारण ध्रुवीयकरण करणारे आहे. जात, धर्म, लिंग, रंग या आधारे भेद करणारे आहे. या विरोधात ही यात्रा आहे. भारत देश विविधततेने नटलेला आहे. पण, त्याला भाजप छेद देतोय. त्यामुळे देशाला जोडण्यासाठी ही यात्रा अतिशय महत्त्वाची आहे. यात मी अनेक दिवसांपासून चालत आहे.
युवा वर्गाला पक्ष महत्त्व देतोय. आम्ही समानता, रोजगार यांची मागणी करतोय. त्यासाठी ही यात्रा आहे. महाराष्ट्रात यात्रेने चांगलीच वातावरण निर्मिती केली. यात्रेची माहिती सर्वांपर्यंत पोचावी यासाठी आमची युवक कॉंग्रेसची टीम दोन महिन्यांपासून झटत होती. आम्हालाही राहुल यांच्यासोबत चालायचे म्हणून शेकडो फोन येत होते. पक्षासह आम्हा युवकांना यामुळे उभारी मिळाली. आता केवळ गृहित धरले जात नाही. निर्णय प्रक्रियेत आहोत असे कौस्तुभ नवले (जिल्हाध्यक्ष, युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड विभाग) यांनी म्हटले आहे.
तर या यात्रेमुळे महात्मा गांधी यांच्या दांडी यात्रेची देशाला आठवण झाली. मी कन्याकुमारीपासून यात सहभागी आहे. युवकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळतोय. कॉंग्रेसमध्ये युवा वर्गाचे भवितव्य चांगले आहे. राजकीय महत्त्वाकांक्षा घेऊन चालतेय. ज्येष्ठ, मोठे नेते आस्थेने चौकशी करतात, काळजी घेतात. माझ्यासारख्या विद्यार्थी नेत्यांनाही यामुळे महत्त्व आलेय, असे नेहल देशमुख (प्रदेश सचिव एनएसयूआय) यांनी सांगितले.
केंद्रातील असो वा राज्यातील हे सरकार फसवणूक करणारे आहे. देशात बेरोजगारी, महागाई वाढली. धार्मिक, जातीय द्वेष वाढला. त्याविरोधात ही यात्रा आहे. युवकांचा तिला मोठा पाठिंबा मिळतोय. कॉंग्रेसमध्ये युवकांना महत्त्वाचे स्थान आहे. त्यांच्या गुणवत्तेला संधी आहे. देशाला कॉंग्रेसची आणि कॉंग्रेसला युवकांची गरज आहे. देशासाठी युवकांनी कॉंग्रेससोबत यावे, असे आवाहन निखिल डवळे (जिल्हाध्यक्ष, युवक कॉंग्रेस, रायगड) यांनी यात्रेच्या निमित्ताने केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.