MNS Leader Bala Nandgaonkar
MNS Leader Bala Nandgaonkar Sarkarnama
मराठवाडा

MNS : राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे अनेक नास्तिक हे आस्तिक झाले.. देवळात जाऊ लागलेत..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेली हिंदुत्वाची आणि मशिदीवरील भोंग्या संदर्भातील भूमिका आता सगळ्यांना पटू लागली आहे. उत्तर प्रदेश सरकारने या संदर्भात निर्णय घेतला आहे, तिथे तसे आदेश देखील दिले गेलेत. (MNS) त्यामुळे उत्तर प्रदेश सरकार आणि मुख्यमंत्री योगी यांचे मी विशेष अभिनंदन करतो.

राजसाहेबांच्या भूमिकेमुळे अनेक नास्तिक आस्तिक झाले आहेत, रामनवमी, हनुमान जंयतीला मंदिरात जाऊन आरती करत होते. (Aurangabad) भगवा झेंडा घेऊन नाचत होते, हा बदल तुम्ही लक्षात घ्या, असे म्हणत मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी विरोधकांना टोला लगावला. (Marathwada)

१ मे रोजी औरंगाबादेत होणाऱ्या राज ठाकरे यांच्या सभेसाठीच्या मैदानाची पाहणी करण्यासाठी नांदगांवकर मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर गेले होते. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलतांना त्यांनी पोलिस आम्हाला परवानगी देतील, असा विश्वास व्यक्त करतांनाच आम्ही देखील त्यांना सहकार्य करू असे म्हटले आहे.

बाळा नांदगावकर म्हणाले, मराठवाडा सांस्कृतिक मंडळाला एक इतिहास आहे, इथे बाळासाहेब, राजसाहेब यांच्यासह अनेक नेत्यांच्या सभा झाल्या आहेत. त्यामुळेच आम्ही या मैदानाची निवड केली आहे. सभा घेतांना सगळ्या प्रकारची काळजी आम्ही घेणार आहोत. पोलिसांनी देखील मैदानाची येऊन पाहणी केली आहे, त्यामुळे माझा पोलिसांवर विश्वास आहे, ते परवानगी देतील.

१ मे महाराष्ट्र दिन असल्यामुळेच आम्ही सभेसाठी हा दिवस ठरवला होता अन् त्यामुळेच या सभेला एवढे महत्व प्राप्त झाले आहे. राज ठाकरे हे या सभेत भोग्याशिवाय राज्य आणि देशातील विविध विषयांवर देखील बोलणार आहेत. तुम्ही फक्त भोंगाच वाजवताय, असेही नांदगावकर म्हणाले. मनसेने भोंगे खरेदी करून ठेवले आहेत का? यावर नाही असे उत्तर त्यांनी दिले. सभेच्या परवानगी संदर्भात माझे पोलिस आयुक्तांशी बोलणे सुरू आहे, आम्हाला लवकरच परवानगी मिळेल, असेही नांदगांवकर म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT