ED Action On Rohit Pawar Sarkarnama
मराठवाडा

ED Action On Rohit Pawar : आमदार रोहित पवारांना ईडीचा जोरदार दणका; कोट्यवधींच्या मालमत्तेवर टाच!

MLA Rohit Pawar On ED Action : "छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड साखर कारखान्याची 161.30 एकर जमीन जप्त केली आहे."

Chaitanya Machale

Marathwada News : आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर कारवाई करत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) काही मालमत्ता जप्त केली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली असून, हा आमदार रोहित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

दोन महिन्यांपूर्वी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ईडीच्या अधिकाऱ्यांनी आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीची तपासणी सुरू केली होती. त्यानंतर ही चौकशी सुरूच होती. दरम्यान, आता ईडीने बारामती ॲग्रो कंपनीशी संबंधित असलेल्या छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड साखर कारखान्याची 161.30 एकर जमीन जप्त केली आहे. यामध्ये साखर कारखान्याची इमारत, जमीन, शुगर प्लांट यासह अन्य काही गोष्टींचा समावेश आहे.

प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँर्डिंग (पीएमएलए), 2002 कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. 50.20 कोटी रुपयांमध्ये खरेदी केलेल्या कन्नड सहकारी साखर कारखान्याची 161 कोटी रुपये किंमत असलेली मालमत्ता ईडी (ED Action) जप्त केली आहे.

नक्की काय आहे प्रकरण?

आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्याशी संबंधित असलेल्या बारामती अ‍ॅग्रो लिमिटेडकडे कन्नड कारखान्याची मालकी आहे. कन्नड सहकारी साखर कारखाना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून बेकायदेशीरपणे केवळ 50.20 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची चौकशी गेल्या काही महिन्यांपासून सुरू झाली होती. ईडी च्या वतीने ही चौकशी सुरू होती.

बेकायदेशीर विक्रीशी संबंधित प्रकरणात कारखान्याची कन्नड येथील 161.30 एकर जमीन, प्लांट आणि यंत्रसामग्री आणि साखर कारखान्याची इमारत अशी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT