Sanjay Raut Narakatla Swarg book : शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत लिखित नरकातला स्वर्ग पुस्तकावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे.
यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया देताना, राऊतांच्या वर्मावरच घाव घातला आहे. राऊतांनी पुस्तकाचं श्रेय, स्वप्ना पाटकरांना द्यावं, अशी खोचक प्रतिक्रिया देताना राऊतांच्या जुन्या प्रकरणातील जखमेवरची खपली काढत, डिवचलं आहे.
ईडीकडून अटक होणार होती, त्यावेळी एकनाथ शिंदेंनी आपल्याला फोन केल्याचा गौप्यस्फोट संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. भाजप नेत्यांशी बोलतो, असे म्हटले होते. तसा पुस्तकात देखील संदर्भ दिला आहे. त्यावर नीलम गोऱ्हे म्हणाल्या, "असे फोन ऐकायला आपल्याकडे 'कर्णपिशाच्च' नाही. संजय राऊत कशासाठी जेलमध्ये गेले होते? कुठला सत्याग्रह, आंदोलन असे काहीच नाही. पत्राचाळीतील गरिब लोकांच्या पैशांमध्ये त्यांनी अफरातफर केली. मनी लाँडरिंग केले. साक्षीदारांवर दबाव आणला. धमकावल. स्वप्ना पाटकर यांच्यावर दबाव आला. यात ते नरकातल्या स्वर्गात गेले".
संजय राऊत स्वतःला स्वातंत्र्यवीर समजत आहे. टीआरपी मिळून आपणच सर्वश्रेष्ठ नेते आहोत, असे भासवत आहेत. धडपड दिसते आहे. ते जे काही घटना सांगत आहे, त्या व्यक्ती आहेत, त्यात पंतप्रधान मोदीसाहेब आहेत, अमित शाह (Amit Shah), स्वतः शिंदेसाहेब असतील, ते सक्षम आहेत. ते स्वतः देखील बोलतील, असे नीलम गोऱ्हे यांनी म्हटले.
'संजय राऊत यांच्याविषयी बोलत आहात, पण ते कुणीही छापणार नाही, असे मला सांगितले जात होते. पण तसे नाही. सत्य जे आहे, ते आहे. संजय राऊत यांचे पुस्तक कशामुळे आहे. स्वप्ना पाटकरांना त्याचे श्रेय दिले पाहिजे. त्यांनी त्यांना खूप शिव्या दिल्या. महिल्यांविषयी त्यांची भूमिका यातून समोर आली. मनी लाँडरिंग केलय. राजकीय दृष्ट्या ते एका पक्षाच्या महत्त्वाच्या पदावर आहेत. या पदाचा उपयोग ते करून घेत आहेत', असा टोला देखील नीलम गोऱ्हे यांनी लगावला.
संभाजीनगरचा पाणी प्रश्नावर काल आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महामोर्चा काढण्यात आला होता. त्यावर नीलम गोऱ्हे यांनी जोरदार टीका केली. हा प्रश्न रखडण्यामागे झारीतील शुक्राचार्य कोण? असा प्रश्न करत नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर निशाणा साधला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 'लबाडांनो पाणी द्या', अशी टीका गोऱ्हे यांनी आंदोलनावर केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.