परभणी: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (Nationalist Congress Party) प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) सध्या राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेनिमित्त मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे पाथरीचे तालुकाध्यक्ष एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना तब्बल १७ वर्षांनंतर मंत्री जयंत पाटील यांचे आभार मानण्याची संधी मिळाली आहे.
परिवार संवाद यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या पाथरी येथील आढावा बैठकीत एकनाथ शिंदे यांनी २००४ साली पाथरी पंचायत समितीचे सभापती असलेल्या एकनाथ शिंदे यांनी ग्रामविकासमंत्री असताना जयंत पाटलांकडे सभापतींना वाढीव मानधन मिळावे, तसेच वाहतुकीसाठी वाहन मिळावे, अशी मागणी एका कार्यक्रमात केली होती, असा किस्सा सांगितला. तेव्हा जयंत पाटील यांनी ती मागणी तात्काळ मान्य करत सभापतींचे मानधन ३ हजारांवरून १२ हजार इतके करण्याची घोषणा केली. शिवाय जयंतराव पाटील मुंबईत पोहोचण्याआधीच या निर्णयाची अंमलबजावणी झाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. या गोष्टीला १७ वर्षे उलटली असून आज जयंतराव पाटील पाथरीत आले असता पाथरीचे तालुकाध्यक्ष या नात्याने एकनाथ शिंदे यांना आढावा बैठकीनिमित्ताने बोलण्याची संधी मिळाली आणि १७ वर्षांपूर्वी घेतलेल्या निर्णयाबाबत एकनाथ शिंदे यांनी मंत्री जयंत पाटील यांचे आभार मानले.
चांगली कामगिरी केल्याबद्दल जयंत पाटील केला सत्कार...
दरम्यान पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून बुथ कमिट्या सक्षम करण्यासाठी जयंत पाटील मोठे कष्ट घेत आहेत. पाथरीचे तालुकाध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी आपल्या तालुक्यात ८० टक्के बुथ कमिट्या पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे चांगली कामगिरी केल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कारही यावेळी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.