Election Commission notice to Archana Patil Sarkarnama
मराठवाडा

Archana Patil: निकालाला काही तास शिल्लक असतानाच महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील अडचणीत!

Election Commission notice to Archana Patil:जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच विनापरवाना सभा घेतल्याप्रकरणी अर्चना पाटील यांच्यासह दोघांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mangesh Mahale

Dharashiv Lok Sabha 2024, 1 June: लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून धाराशिव लोकसभा मतदारसंघ वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. निवडणूक निकालाला तीन दिवस बाकी असताना महायुतीच्या उमेदवार अर्चना राणाजगजितसिंह पाटील (Archana Patil) या अडचणीत येण्याची शक्यता आहे. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस धाडली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच विनापरवाना सभा घेतल्याप्रकरणी त्यांच्यासह दोघांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्चना पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरताना शक्ती प्रदर्शन करीत सभा घेतली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीचे अनेक नेते सभेला उपस्थित होते.

धाराशिव लोकसभा मतदारसंघात (Dharashiv Lok Sabha 2024) महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात महायुतीकडून भाजपचे आमदार राणाजगजितसिंह यांच्या पत्नी अर्चना पाटील या मैदानात आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ओमराजे निंबाळकर यांनी तेरणा हॉस्पीटलने रुग्णावर उपचार करण्यासाठी राज्य सरकारकडून 18 कोटी रुपये घेतले असल्याचा आरोप राणाजगजितसिंह यांनी केला होता. तर अर्ज दाखल करताना अर्चना पाटील यांनी सभेला गर्दी करण्यासाठी 500 ते 1000 रुपये दिले होते, अशी तक्रार ओमराजेंनी निवडणूक आयोगाकडे केली होती. दोन्हीही उमेदवारांनी विजयाचा दावा केला आहे. गुलाल कोण उधळणार याला आता काही तास शिल्लक आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT