Marathwada : जिल्ह्यातील चार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Nanded APMC Election) निवडणुकच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस. गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलेले होते. सगळ्याच राजकीय पक्षांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत कुरघोडी केली. परंतु ही निवडणूक जरी बाजार समितीची असली तरी प्रचार सभेत मात्र राज्य व देशपातळीवरील मुद्यांवर भाषणबजी करण्यात आली.
शेतकऱ्यांना (Farmers) बाजार समितीत मिळणाऱ्या सुविधा, शेतकऱ्यांच्या अडचणी या विषयावर कोणीही बोलले नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. वैयक्तिक टीका आणि आरोप प्रत्यारोपांमुळेच निवडणूक प्रचार अधिक चर्चेत राहिला. (Mahavikas Aghadi) या निवडणूकीत स्थानिक पातळीवरील नेत्यांनी सत्तेसाठी तत्वांशी तडजोड करत जमेल तशी आघाडी-युती केली. त्यामुळे वर्षानुवर्षे एकमेकांच्या विरोधात लढणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची मात्र अडचण झाली.
आर्थिक दृष्ट्या कुमकूवत असलेल्या प्रामाणिक कार्यकर्त्यांकडे उमेदवारी देतांना सगळ्याच राजकीय पक्षांनी पाठ फिरवल्याचे देखील दिसून आले. (Marathwada) कुंटूर बाजार समितीच्या जागा काँग्रेस भाजपाने वाटून घेत निवडणूक बिनविरोध केली. (Nanded) भोकर बाजार समिती मध्ये महाविकास आघाडीत बिघाडी झाली तर नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी झाली. त्यामुळे चारही बाजार समित्यांमध्ये नेत्यांनी सोयीचे राजकारण केल्याचे पहायला मिळाले.
कृषी उत्पन्न बाजार समितीत्यांची स्थापना शेतमाल विक्रीवर नियंत्रण, शेतकऱ्यांना सुविधा देणे, खरेदी विक्रीचे व्यवहार कायदेशीर होणे, व्यापाऱ्यांवर नियंत्रण, नोंदणी, आदी महत्त्वाच्या बाबींवर लक्ष ठेवण्यासाठी झाली. पण मुळ उद्देश बाजूला गेला असून या बाजार समित्या आता राजकारणाचे एक केंद्र झाले आहे. या समितीवर आपली पकड राहावी यासाठी निवडणूकीत कोट्यवधींचा खर्च केला जात आहे, तो कशासाठी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था, बाजार समिती, सहकारी बँक, दूध संघ, साखर कारखाने आदी संस्थांवर सत्ता मिळवली की पक्षाचा व आपला जनाधार वाढविण्यासाठी मदत होते. शिवाय आपला जयघोष करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देता येतो. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री, खासदार, आमदार, माजी मंत्री, माजी खासदार आमदार, आदी नेते प्रचारात उतरले. मात्र सामान्य शेतकरी या संपुर्ण प्रक्रियेत कुठे आहे ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.