Raosaheb Danve, Gram Panchayat Election
Raosaheb Danve, Gram Panchayat Election Sarkarnama
मराठवाडा

Gram Panchayat : दानवेंच्या गावात तीस वर्षांनंतर निवडणूक प्रतिष्ठा पणाला; मंत्र्यांची मध्यस्थी अयशस्वी

सरकारनामा ब्यूरो

Gram Panchayat Election : राज्यात ग्रामपंचायतींची (Gram Panchayat Election) रणधुमाळी सुरू आहे. आता प्रचाराला थोडेच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून आपापल्या मतदारसंघात आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. प्रतिष्ठा पणाला लागलेल्या ग्रामपंचायत आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी देखील त्यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत.

ग्रामपंचायत निवडणुका भल्या-भल्या नेत्यांना डोकेदुखी ठरणार असल्याचे दिसत आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या जन्मगावात तब्बल 30 वर्षांनी ग्रामपंचायती निवडणूक होणार आहे. रावसाहेब दानवे यांच जन्मगाव असलेल्या जवखेडा खुर्द गावात 30 वर्षानंतर ग्रामपंचायतीचा धुराळा उडणार आहे.

30 वर्ष बिनविरोध होणाऱ्या या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी आणि दोन सदस्यांसाठी निवडणूक होत आहे. एकूण 7 सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीमध्ये 3 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. मात्र, सरपंच पदासाठी आणि दोन सदस्यासाठी निवडणूक होणार आहे.

गावातील निवडणूक बिनविरोध करण्यासाठी दानवे यांनी मध्यस्थी देखील कामाला आली नाही, अशीह माहिती मिळत आहे. रावसाहेब दानवे यांचे चुलत भाऊ मधुकर दानवे यांच्या पत्नी सुमन दानवे या भाजपकडून (BJP) सरपंच पदासाठी उमेदवार आहेत. तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार सुनिता संतोष दानवे रिंगणात आहेत. आता या निवडणुकीत कोणाचा विजय होणार हे याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

जालना जिल्ह्यात तब्बल 266 ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू आहे. अंबडमध्ये 40, जालना 29 , परतूर 41, मंठा 35. घनसावंगी 34, जाफराबाद 55 व भोकरदनमधील 32 ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत. ग्रामपंचायतीसाठी 18 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 20 डिसेंबरला मतमोजणी आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT