Grampanchayat News, Sambhajinagar Sarkarnama
मराठवाडा

Grampanchayat News : गायरान जमीनीवरील अतिक्रमण भोवले, महिलेचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द..

Collector : गायरान जमिनीवर मिनाबाई व विष्णू बनकर यांनी अतिक्रमण केल्याचे दिसून येते असा अहवाल सादर केला.

सरकारनामा ब्युरो

Chhatrapati Sambhajinagar : टोनगाव (जि. छत्रपती संभाजीनगर) येथील ग्रामपंचायत सदस्य मिनाबाई विष्णू बनकर यांचे सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय (Astikkumar Pandey) यांनी दिले. टोनगाव येथे मिनाबाई विष्णू बनकर या सन २०२० मध्ये ग्रामपंचायत निवडणूकीत महिला राखीव जागेवर निवडून आलेल्या आहेत.

मात्र त्यांचे पती विष्णू बनकर यांनी टोणगाव गट नं. १ मधील सरकारी गायरान जमिनीवर (Maharashtra) वीस ते पंचवीस वर्षापासून अतिक्रमण केल्याप्रकरणी प्रफुलकुमार आसाराम रणभरे यांनी ॲड शरद भागडे यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम अन्वये तक्रार केली होती. (Marathwada)

मिनाबाई बनकर यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानूसार तहसीलदारांनी १८ एप्रिल २०२२ रोजी प्रत्यक्ष स्थळपहाणी केली. त्यानंतर गट क्र. १ येथील गायरान जमिनीवर मिनाबाई व विष्णू बनकर यांनी अतिक्रमण केल्याचे दिसून येते असा अहवाल सादर केला.

सुनावणीनंतर १७ फेब्रुवारी २०२३ रोजी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी अर्जदार प्रफुल्लकुमार रणभरे यांचा अर्ज मंजूर करत मिनाबाई बनकर यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश दिले.

ग्रामपंचायत सदस्य असलेल्या महिलेसह तिच्या पतीने गेल्या २०-२५ वर्षापासून गायरान जमीनीवर अतिक्रमण केले होते. अखेर हे प्रकरण उजेडात आले आणि सदर महिलेचे सदस्यत्व रद्द झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT