Thackeray-Imtiaz-Pawar Sarkarnama
मराठवाडा

प्रस्ताव नाकरल्यावरही इम्तियाज जलील जोर लावणार, ठाकरे-पवारांची भेट घेणार..

मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया आपण वाचली, आश्चर्य वाटले. पण भाजपला रोखण्यासाठी आघाडी सोबत जाण्याचा आपला विचार कायम आहे. (Mp Imtiaz Jalil)

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासोबत झालेल्या सांत्वनपर भेटीत महाविकास आघाडीत सहभागी होण्याचा प्रस्ताव दिला. (Aimim) या प्रस्तावामुळे महाविकास आघाडी सरकारमधील तीनही घटक पक्षांमध्ये खळबळ उडाली. (Uddhav Thackeray) शिवसेनेला हा भाजपचा डाव वाटला, राष्ट्रवादीने सावध भूमिका घेतली, तर काॅंग्रेसने विचार करू म्हणत भूमिका गुलदस्त्यात ठेवली.

परंतु एमआयएमच्या प्रस्तावाचे इतके तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटले की सगळेच पक्ष या नव्या राजकीय समीकरणांकडे डोळे लावून बसले. (Imitaz Jalil) राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे नेते संजय राऊत, काॅंग्रेसचे नाना पटोले, थोरात यांनी एमआयएमला आघाडीत घेण्यात उत्सकूता दाखवलेली नाही. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या राज्यसभेतील खासदार सुप्रीय सुळे यांनी मात्र एमआयएमच्या प्रस्तावाचे स्वागत करत सगळ्यांना धक्काच दिला.

भाजपची ही खेळी असल्याचा शिवसेनेने आरोप केल्यानंतर एमआयएमचा निशाणा योग्य ठिकाणी बसल्याची खात्री पटल्याने खासदार इम्तियाज जलील यांनी आता महाविकास आघाडीत सामील होण्याचा मुद्दा आणखी नेटाने रेटण्याची खेळी आखली आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादेत आपण शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणार असल्याचे प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना खासदार व पदाधिकाऱ्यांची बैठकी एमआयएमचा डाव उधळून लावा, असे आवाहन केले, तर दुसरीकडे आम्हाला सोबत घ्या, या मागणीसाठी इम्तियाज जलील हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत.

मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया आपण वाचली, आश्चर्य वाटले. पण भाजपला रोखण्यासाठी आघाडी सोबत जाण्याचा आपला विचार कायम आहे. या संदर्भात मी मुख्यमंत्री आणि शरद पवार यांची लवकरच भेट घेणार आहे, असेही इम्तियाज यांनी म्हटले आहे. त्यामुळे एमआयएमचा महाविकास आघाडीत सहभागी होण्याचा मुद्दा आणखी गाजणार एवढे मात्र निश्चित.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT