Jaydatat Kshirsagar
Jaydatat Kshirsagar  Sarkarnama
मराठवाडा

मोठी बातमी : जयदत्त क्षीरसागर यांची शिवसेनेतून हकालपट्टी

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : शिवसेना नेतृत्वाशी गेली तीन वर्षांपासून फटकून वागणे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर (Jaydatta Kshirsagar) यांना महागात पडले आहे. शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असूनही दोन दिवसांपूर्वी भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित करणारे क्षीरसागर यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. (Big News: Expulsion of Jaydatta Kshirsagar from Shiv Sena)

विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीवेळी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शिवसेनेत प्रवेश केला होता. निवडणुकीत मात्र त्यांचा पुतण्या संदीप क्षीरसागर यांच्याकडून पराभव झाला होता. त्यानंतर राज्यात नव्याने समीकरणं जुळून महाविकास आघाडीचे सरकार आले होते. मात्र, निवडणुकीतील पराभव आणि महाविकास आघाडीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिल्याने क्षीरसागर हे गेल्या तीन वर्षांपासून अडगळीत पडले होते.

जयदत्त क्षीरसागर हे शिवसेनेत असूनही पक्षाशी फटकून वागत होते. ते पक्षाच्या कार्यक्रमाला अनेका वेळा अनुपस्थित असायचे. त्यामुळे ते शिवसेनेत असून नसल्यासारखे होते. क्षीरसागर यांचा राजकारणातील बहुतांश काळ हा शरद पवारांचे कट्टर समर्थक म्हणून गेला आहे. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीपासून त्यांनी राष्ट्रवादीशी फारकत घेतली होती.

गेल्या काही दिवसांपासून त्यांची एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक वाढली होती. त्यातच चार दिवसांपूर्वी झालेल्या कार्यक्रमाला त्यांनी उद्वव ठाकरेंऐवजी शिंदे आणि फडणवीस यांना बोलावले होते. विशेष म्हणजे ज्या कामांचे भूमिपूजन शिंदे आणि फडणवीस यांनी केले , त्या कामाला महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजुरी मिळाली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT