Bjp Leader Pankaja Munde News,  Sarkarnama
मराठवाडा

Pankaja Munde : पंकजा म्हणतात, तिळाची उर्जा आणि गुळाचा गोडवा कायम राहावा..

Maharashtra Political : जीभेवर जर कडू पदार्थ ठेवला तर त्याचा कडवटपणा आपल्या अंगात उतरतो

सरकारनामा ब्युरो

Marathwada News : गहिनीनाथ गडावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, खासदार प्रतीम मुंडे गैरहजर राहिल्या. यावरून फडणवीस आणि मुंडे भगिनींमधील कटुता पुन्हा एकदा समोर आली. (Bjp)भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सारवासारव केली, पण मकरसंक्रांतीचा सण आणि तिळगुळ घ्या, गोडगोड बोला म्हणण्याची संधी या निमित्ताने पंकजा मुंडे यांनी घालवली का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

फडणवीस यांनी आपल्या भाषणात गोपीनाथांचा मला राजकारणात आशिर्वाद लाभल्याचे सांगत त्यांच्याबद्दल आपल्या मनात आदर कायम असल्याचे दाखवून दिले. तर दुसरीकडे पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मात्र फडणवीसांच्या (Devendra Fadanvis) कार्यक्रमाला टाळत आपल्यातील कटुता कायम असल्याचे दाखवून दिले. विशेष म्हणजे, मकरसंक्रांतीच्या पुर्वसंध्येला शुभेच्छा देतांना पंकजा मुंडे यांनी सगळ्यांना कटुता नाहीसी करून तिळाची उर्जा आणि गुळाचा गोडवा आपल्या आयुष्यात उतरवावा, असे सांगतिले.

प्रत्यक्षात मात्र त्यांनी त्याविरुद्ध कृती केल्याचे दिसून आले. बीड जिल्ह्यातील सलग दुसरा असा हा कार्यक्रम होता, ज्यात पंकजा यांनी फडणवीस यांच्यासोबत व्यासपीठावर एकत्र येणे टाळले. पंकजा मुंडे या स्वाभीमानी नेत्या आहेत, मी कधी कुणासमोर झुकणार नाही, वाकणार नाही हा त्यांचा बाणा कायम आहे. परंतु कटुता मनात ठेवायची नाही या आपल्या विचारांपासून त्याच लांब जात आहेत का? असा प्रश्न या निमित्ताने पडल्याशिवाय राहत नाही.

मकरसंक्रांत म्हणजे तिळगुळ घ्या गोडगोड बोला म्हणत कटुता विसरण्याचा सण असे म्हणत पकंजा यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. जीभेवर जर कडू पदार्थ ठेवला तर त्याचा कडवटपणा आपल्या अंगात उतरतो, त्यामुळे नेहमी जीभेवर गोडवा ठेवून तोच आपल्या जीवनात उतरवावा, असे आवाहन त्यांनी शुभेच्छा देतांना केले.

आपण आपल्या आयुष्यात कधीच कटुता बाळगत नाही, तिळाची उर्जा आणि गुळाचा गोडवाच अंगी बाळगतो हे सांगायला देखील त्या विसरल्या. मग त्यांची कृती नेमकी वेगळी का? असा प्रश्न या निमित्ताने पडल्याशिवाय राहत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT