Sambhaji Patil Nilangekar-Amit Deshmukh Sarkarnama
मराठवाडा

फडणवीसांना मुख्यमंत्री असल्यासारखे वाटते; त्यांचाच परिणाम माजी पालकमंत्र्यांवर झालाय

(Guardian Minister Amit Deshmukh)संभाजी पाटील निलंगेकर यांनी आपल्या प्रत्येक भाषणातून पालकमंत्री अमित देशमुख यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

जगदीश पानसरे

लातूर ः राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अजूनही आपण मुख्यमंत्रीच आहोत असे वाटते, त्यांचाच परिणाम माजी पालकमंत्र्यांवर झाला आहे. त्यांना देखील अजूनही आपणच जिल्ह्याचे पालकमंत्री आहोत, असे वाटते त्याला काय करावे? असा टोला लातूरचे पालकमंत्री तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांना लगावला.

गेल्या कित्येक दिवसांपासून संभाजी पाटील निलंगेकर यांनी आपल्या प्रत्येक भाषणातून पालकमंत्री अमित देशमुख यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. विशेषतः जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नूकसान, सोयाबीन उत्पादकांचे होत असलेले नूकसान या मुद्यावरून संभाजी पाटील यांनी पालकमंत्री देशमुख यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले होते.

शेतकऱ्यांवर झालेला अन्याय दूर करून त्यांना भरीव मदत मिळावी यासाठी संभाजी पाटील निलंगकेर यांनी चारशे शेतकऱ्यांसह लातूरच्या शिवाजी चौकात ७२ तासांचे अन्नत्याग आंदोलन केले होते. या आंदोनाला चांगला प्रतिसाद देखील मिळाला. या आंदोलनात देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीला पालकमंत्री अमित देशमुख हेच जबादार असल्याचा आरोप संभाजी पाटील यांनी केला होता.

पालकमंत्र्यांनी जरा लातूरात येऊन शेतकऱ्यांचे हाल पहावेत, मंत्री असून देखील त्यांना शेतकऱ्यांसाठी एक रुपयांची देखील मदत सरकारकडून आणता आली नाही. हेलिकाॅप्टरमधून येऊन त्यांनी फक्त हवाई पाहणी केली, रस्त्यालगतच्या शेतात पाहणी करून निघून गेले, अशी टीका देखील निलंगेकर यांनी केली होती.

अमित देशमुख यांनी आज लातूरात निलंगेकरांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. अमित देशमुख म्हणाले, राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच आपल्याला अजूनही मुख्यमंत्री असल्या सारखे वाटत असल्याचे विधान केले होते. याचाच परिणाम माजी पालकमंत्र्यांवर झालेला दिसतोय.

त्यांना अजून देखील आपणच पालकमंत्री आहोत असे वाटत असावे, पण त्याला आपला नाईलाज आहे. माजी मंत्र्यांच्या आंदोलनाने लातूरकरांना लोककला पहायला मिळाली, त्याबद्दल महापालिकेचे अभिनंदन केले पाहिजे, असा टोला देखील अमित देशमुख यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT