Amarsinh Pandit On Farmers Sarkarnama
मराठवाडा

Amarsinh Pandit On Farmers : सरकारी हस्तक्षेप थांबवा, शेतकऱ्यावर हात पसरण्याची वेळ येणार नाही..

सरकारनामा ब्युरो

Marathwada Political News : पेरणीसाठी शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे का ? तर निश्चित मिळाली पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही. पण शेतकऱ्याला लागणाऱ्या विज, पाणी आणि शेतीमालाच्या दरात सरकारी हस्तक्षेप थांबला तर बरेच प्रश्न सुटतील. (Amarsinh Pandit On Farmers Issue) दरवेळी शेतकऱ्याला सरकारी मदतीची वाट पहावी लागणार नाही, एक वर्ष तो तग धरू शकतो, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी आपली भूमिका मांडली.

मराठवाडा (Marathwada) सध्या दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे. कापूस, सोयाबीन पिकांसह काही भागातील मोसंबीच्या बागाही उखडून फेकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. नव्या वाणांचे संशोधन नाही, शेतकऱ्यांचे स्त्रोत्र बंद केले जात आहेत. पण यावर उपाययोजना करायला कोणीही तयार नाही, अशी खंतही पंडित (Amarsinh Pandit) यांनी `काॅफी विथ सकाळ` मध्ये बोलतांना व्यक्त केली.

ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था ही शेती आणि त्यावरच्या पूरक व्यवसायावर अवलंबून असते. पण जेव्हा शेतकऱ्याच्या पदरात काही पडण्याची वेळ येते तेव्हा सरकार चुकीचे निर्णय घेऊन त्यांना अडचणीत आणते. (Farmers) ऊस, साखर, कापूस याचे उत्पादन लक्षात न घेता निर्यातीचे धोरण ठरवले जाते, त्याचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसतो.

केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्याला लागणाऱ्या विज, पाणी आणि शेतमालाच्या दरातील हस्तक्षेप थांबवला तर त्याला मदतीसाठी कोणापुढे हात पसरण्याची वेळ येणार नाही. पण कापूस, साखर, कांद्याला जरा कुठे जास्त भाव मिळायला लागला की, त्याच्या निर्यातीवरचे शुल्क वाढवले जाते, ओरड केली जाते. यातून शेतकऱ्याचे नुकसान होते पण यावर कोणीही आवाज उठवत नाही.

शेती उत्पादन वाढीसाठी नव्या बियाणांच्या संशोधन संस्थांना बळ देण्याची गरज असल्याचे मतही पंडित यांनी व्यक्त केले. पश्चिमेकडील पाणी वाहून आणण्याचे प्रयत्न आणि तशी घोषणा केली जातेय, पण प्रत्यक्षात ते शक्य नाही. शेतकऱ्यांचा राजकारणासाठी कायम वापर केला जातो, त्यामुळे त्यांच्या प्रश्नावर संघटना आणि लोकप्रतिनिधी देखील एकजूट होत नाहीत. माध्यमांमध्ये देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नाला महत्व दिले जात नाही, असा आरोप देखील पंडित यांनी केला.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT