Pritam Munde-Devendra Fadanvis

 

Sarkarnama

मराठवाडा

फडणवीसांच्या काळात पन्नास टक्के निधी वेळोवेळी मिळाल्याने बीड रेल्वेला गती..

मोदी सरकारकडून देखील या कामासाठी मोठा निधी दिला गेला. त्याचाच परिणाम म्हणून आज मी आपल्या हक्काची रेल्वे घेण्यासाठी आष्टीत जात आहे. (Pritam Munde)

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद ः नगर-बीड रेल्वेचा ७० किलोमीटरचा ट्रायल रन आज घेण्यात आला. बीड जिल्हावासियांसाठी तसेच रेल्वेच्या लढ्यात ज्यांनी ज्यांनी योगदान दिले त्या सर्वांसाठी हा अभिनंदनाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या रुपाने सर्वात आधी या रेल्वे मार्गासाठी निधी मिळाला.

राज्यात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) मुख्यमंत्री आणि पकंजा ताई पालकमंत्री होत्या तेव्हा राज्याचा वाटा वेळोवेळी मिळाला, त्यामुळेच या रेल्वे मार्गाच्या या कामाला गती मिळाल्याचे बीडच्या भाजप खासदार डाॅ.प्रितम मुंडे (Pritam Munde) यांनी म्हटले आहे.

आष्टी येथून हक्काची रेल्वे आणण्यासाठी जात आहे, असे म्हणत त्यांनी या रेल्वे बद्दल आनंद व्यक्त केला. प्रसार माध्यमांशी बोलतांना प्रितम मुंडे म्हणाल्या, आजचा दिवस सगळ्यांसाठी अभिनंदनाचा आणि अभिमानाचा आहे. गेल्या अनेक वर्षाच्या लढ्यात फक्त गोपीनाथ मुंडे, अमोल गलधर ही दोनच नावे आपल्या माहित आहे. पण ही दोन नावेच घेतली तर बीड रेल्वेसाठी ज्यांनी ज्यांनी लढा दिल्या त्यांच्यावर तो अन्याय होईल.

त्यामुळे बीड रेल्वेसाठी प्रयत्न केलेल्या प्रत्येकाचे या निमित्ताने आभार मानले पाहिजे. गोपीनाथ मुंडे यांच्या रुपाने सर्वात प्रथम या रेल्वे मार्गासाठी मोठा निधी मिळाला होता. त्यानंतर राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या काळात वेळोवेळी पन्नास टक्के निधी मिळत गेला. पंकजाताई तेव्हा पालकमंत्री होत्या,त्यामुळे या कामाला गती मिळत गेली.

मोदी सरकारकडून देखील या कामासाठी मोठा निधी दिला गेला. त्याचाच परिणाम म्हणून आज मी आपल्या हक्काची रेल्वे घेण्यासाठी आष्टीत जात आहे, अशा शब्दात प्रितम मुंडे यांनी रेल्वे लढ्यात साथ देणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानले. गेल्या अनेक वर्षांचे हे बीड जिल्ह्याचे स्वप्न आज साकार होत आहे असेही त्या म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT