उस्मानाबादः ज्यांच्याविरोधात वीस वर्ष संघर्ष केला त्यांच्यासाठीच पक्षप्रमुखांनी माझी पुणे महानगर नियोजन सदस्यपदी निवड केल्याचा दावा शिवसेनेचे आमदार प्रा.तानाजी सावंत यानी केला. त्यांच्या या दाव्यामुळे पुन्हा महाविकास आघाडीत वाद होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
भुम येथील नगरपालिकेच्या विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना प्रा.सावंत यांनी प्रत्यक्ष माजी आमदार राहुल मोटे यांच्यावर तर अप्रत्यक्षरित्या पवार कुटुंबावरच निशाना साधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. भुम नगरपालिकेचे गटनेते संजय गाढवे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकासकामाच्या उद्घाटनाला प्रा.तानाजी सावंत व खासदार ओमराजे निंबाळकर उपस्थित होते.
यावेळी सावंत यांनी महाविकास आघाडीच्या आमदारासह त्यांच्या नेतृत्वावर घणाघात केला. सावंत हे रोखठोक बोलतात याचा पुन्हा एकदा अनुभव मतदारसंघातील जनतेला आला. माजी आमदार राहुल मोटे यांचे नाव न घेता त्यांच्यावर पंधरा वर्षात काय केले? असा सवाल उपस्थित करुन त्यानी फक्त पेट्या पोचवायचे काम केल्याची जहरी टिका केली.
काका, पुतण्या असा नामोल्लेख करत त्यांच्याविरोधात आपण वीस संघर्ष केल्याचे सांगुन त्याचमुळे पक्षप्रमुखांनी आपल्याला महत्वाच्या पीएमआरडीएच्या सदस्यपदी नियुक्त केल्याचे सावंत म्हणाले. पण एवढ्यावरच माझी बोळवण केली का? असा सवाल आपण मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केल्याचेही सावंत यांनी सांगितले.
शिवाय आपण देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातून खासदार होऊ शकतो, माझी ताकद जिल्ह्यातील जनतेला आणि पक्षप्रमुखांना देखील माहित असल्याचे सावंत म्हणाले. राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता असली तरी सावंत यांची भुमिका काहीशी वेगळी असल्याचे त्यांच्या भाषणातून जाणवले.
यापुर्वी देखील सावंत गटाच्या सदस्यांनी जिल्हा परिषदेमध्ये भाजपला साथ देऊन ते कृतीतुन दाखवुन दिले होते. मतदारसंघात ते राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल मोटे यांच्याविरोधात निवडुन आले आहेत. या दोघांमध्ये कमालीचे राजकीय वैर आहे.
साहजिकच त्याच्या पुढचा अध्याय पुन्हा पाहयला मिळत आहे, सावंत यानी थेट हल्ला चढविल्याने, त्यातही पक्षप्रमुखांनी आपल्याला पुण्याच्या नगरनियोजनचे सदस्य जाणीवपुर्वक केल्याचा दावा निश्चितच दोन्ही पक्षामध्ये विस्तव टाकणारा ठरु शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.