AIMIM| Congress|  Nanded Latest Marathi News
AIMIM| Congress| Nanded Latest Marathi News 
मराठवाडा

बॅनर लावण्यावरुन एमआयएम-कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा

सरकारनामा ब्युरो

नांदेड : नांदेडमध्ये मुस्लिम बाहुल भागात काँगेस (congress) आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. रमझान ईदच्या शुभेच्छा बॅनर लावण्यावरून काँग्रेस (Congress) आणि एमआयएमचे (MIM) कार्यकर्ते आपसात भिडले. ऐनवेळी पोलीस तिथे पोहचल्याने परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात यश आले. (Nanded Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, एमआयएमचे अध्यक्ष खासदार असुद्दीन ओवेसी येत्या रविवारी नांदेड दौऱ्यावर जाणार आहेत.मात्र देगलूर नाका भागात मुस्लिम नगरसेवकांनी ईदच्या शुभेच्छाचे बॅनर आधीच लावलेले असताना एमआयएमच्या कार्यकर्त्यांनाही त्याच ठिकाणी बॅनर लावण्याचा हट्ट केला. पण कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तिथं बॅनर लावण्यास विरोध केल्याने दोन गटात बाचाबाची सुरु झाली. यावेळी घटनास्थळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. ही माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे आणखी असा तणाव निर्माण होऊ नये यासाठी सध्या नांदेड शहरात अनेक ठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

अनेक दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दररोज आरोप-प्रत्यारोप होत आहे. राज्यात सध्या बॅनरबाजीतून एकमेकांना डिवचण्याचे प्रमाण वाढलं आहे. त्यातून वादही निर्माण होत असल्याचे दिसत आहे. नांदेडमध्येही एकाच ठिकाणी बॅनर लावण्याच्या हट्टापायी हा वाद झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या घटनेनंतर नांदेडमध्ये तणावपुर्ण शांतता आहे. शहरात महत्त्वाच्या ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. असदुद्दीन ओवेसी नांदेडमध्ये येणार असल्याने पोलिस यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT