वाल्मीक कराडचा राईट हँड म्हणून ओळखला जाणारा गोट्या गित्तेवर सहा दिवसांपूर्वी मकोका रद्द झाला होता.
आता पोलिसांनी पुन्हा कठोर भूमिका घेत त्याच्यावर मकोका लागू केला आहे.
या कारवाईमुळे गुन्हेगारी जगत व राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
Gotya Gette News : परळीतील सहदेव सातभाई मारहाण प्रकरणातील आरोपी गोट्या गीतेवर पोलिसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई केली आहे. या संदर्भातील माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक नवनित कावत यांनी दिली. परळीतील सहदेव सातभाई यांना गंभीर मारहाण करून लूटमारी करण्यात आली होती. या गुन्ह्यात रघु फड, गोट्या गीते यांच्यासह सात जणांविरुद्ध मकोका दाखल करण्यात आला होता. मात्र, अपर पोलिस महासंचालकांनी ही कारवाई रद्द केली होती. त्यानंतर बीड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.
गोट्या गीतेवर बीडसह (Beed News) इतर जिल्ह्यात खून, खूनाचा प्रयत्न, खंडणीसह दहा ते पंधरा गंभीर गुन्हे दाखल असून तो गेल्या अनेक महिन्यांपासून फरार आहे. याआधी गोट्या गीते, जगन्नाथ फड, संदीप सोनवणे, बालाजी दहिफळे, विलास गीते यांचा मकोका रद्द करण्यात आला होता. पण आता केवळ गोट्या गीतेविरुद्ध पुन्हा मकोकाची कारवाई करण्यात आली आहे. सध्या तो फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. वाल्मिक कराडचा राईट हँड म्हणून ओळखला जाणारा गोट्या गित्ते जिंवत माणसाचे श्राद्ध घालण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चर्चेत आला होता.
त्यांनतर रेल्वे ट्रॅकवर बसून ढसाढसा रडतानाचा त्याचा दुसरा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. परळीतील (Parli) रघुनाथ फड टोळीवर सहदेव सातभाई यांच्या खुनाच्या प्रयत्नाचा आरोप होता. गोट्या गित्ते याच्यावर मराठवाड्यातील बीडसह, पुणे व राज्याच्या इतर भागात असे एकूण 16 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावरील मकोकाचा गुन्हा रद्द केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. पोलीस प्रशासन राजकीय दबावात काम करत आहे का? अशी शंका आणि त्यांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात होते.
अखेर आज गोट्या गित्ते याच्यावर पुन्हा मकोका लावण्यात आला आहे. गोट्या गीते याची परळीतच नाहीतर बीड, लातूर, परभणी, पुणे जिल्ह्यातही दहशत होती. या प्रत्येक जिल्ह्यात त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत. वाल्मीक कराड माझे दैवत आहे, माझ्यावर खोटे आरोप लावू नका, असे आवाहन करत आत्महत्येची धमकी देत रेल्वे रुळावर बसलेल्या गोट्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.
तर गोट्या गीते हा वाल्मीक कराड गँगमधील महत्वाचा माणूस असून तो सायको किलर असल्याचा आरोप बाळा बांगर यांनीही केला होता. सहा दिवसांपूर्वी गोट्या गीतेसह इतर आरोपींवरील मकोका हटवण्यात आला होता. मात्र आता इतर आरोपी सोडून एकट्या गोट्या गीतेवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
प्र.1: गोट्या गित्ते कोण आहे?
उ. तो वाल्मीक कराडचा राईट हँड असून अनेक गुन्ह्यांमध्ये सामील असल्याचा आरोप आहे.
प्र.2: गोट्या गित्तेवर आधी मकोका कधी रद्द झाला होता?
उ. फक्त सहा दिवसांपूर्वी त्याच्यावर लावलेला मकोका रद्द करण्यात आला होता.
प्र.3: पुन्हा मकोका का लावण्यात आला?
उ. पोलिसांच्या माहितीनुसार त्याचे गुन्हेगारी नेटवर्क सक्रिय असल्यामुळे कठोर कायदेशीर कारवाई करण्यात आली.
प्र.4: मकोका म्हणजे काय?
उ. महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाईज्ड क्राईम अॅक्ट हा गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई करण्यासाठी बनवलेला कायदा आहे.
प्र.5: या कारवाईचा पुढे काय परिणाम होऊ शकतो?
उ. गुन्हेगारी नेटवर्कवर नियंत्रण मिळविण्यासाठी ही कारवाई महत्त्वाची ठरू शकते, तसेच राजकीयदृष्ट्या देखील चर्चेत राहील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.