Firing in Parli News Sarkarnama
मराठवाडा

Firing in Parli : मुंडेंची परळी गोळीबाराने हादरली..

Crime News : ग्राहक आणि हाॅटेलच्या नोकरामध्ये बाचाबाची झाली. प्रकरण हातघाईवर आले, तेव्हा एकाने थेट पिस्तूल काढले.

सरकारनामा ब्युरो

Marathwada News : राज्यातील विरोधकांकडून सत्ताधाऱ्यावर कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नानावरून सातत्याने टीका केली जाते. (Firing in Parli News) नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनुक्रमे ठाणे आणि नागपूरमध्येच सर्वाधिक गुन्हेगारी वाढल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला होता.

हा आरोप ताजा असतांनाच आता राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा मतदारसंघ असलेल्या परळीत गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. चहाच्या टपरीवर सिगारेटचे पाकीट महाग का दिले? म्हणत अज्ञात व्यक्तीने एकापाठोपाठ असे तीन राऊंड फायर केल्याची माहिती आहे. (Parali) गोळीबाराच्या घटनेने परळी व परिसर हादरून गेला आहे.

मंत्र्यांच्या गावातच अशा घटना घडत असतील तर मग इतरांच्या सुरक्षेचे काय ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थितीत केला जात आहे. (Crime) सदरील घटना परळी शहराजवळच्या कन्हेरवाडी शिवारात काल रात्री दीड ते दोनच्या सुमारास घडली. काळ्या रंगाच्या स्कार्पिओ गाडीतून आंबेजोगाईकडून परळीकडे जात असलेल्या अज्ञातांनी हा गोळीबार केला. या रोडवरील यशराज हाॅटेलमध्ये हा प्रकार घडला.

गाडीतील व्यक्तीने या ठिकाणी चहा घेतला. त्यानंतर सिगारेटचे पाकीट घेतले. त्याचे पैसे देतांना पाकीट एवढे महाग कसे दिले? असे म्हणत गाडीतून आलेल्या व्यक्तीने हाॅटेलचालकाशी वाद घातला. वाद सुरू असतांनाच जवळ असलेल्या पिस्तूलमधून आधी एक राउंड हेवत आणि त्यानंतर दोन राउंड हाॅटेलच्या शटरवर फायर केले. अचानक गोळीबार झाल्याने तिथे खळबळ उडाली. गोळीबार केल्यानंतर आरोपी गाडीत बसून निघून गेले. परळीपासून काही अंतरावर कन्हेरवाडी शिवारात सुरेश फड यांचे यशराज हॉटेल आहे. विलास आघाव हे मागील एक वर्षांपासून ते चालवतात.

रात्री एकच्या सुमारास चौघे चहा पिण्यासाठी काळ्या स्कार्पिओ गाडीतून तिथे आले. हॉटेलमधील नोकराकडे त्यांनी सिगारेटचे पाकीट मागितले. पैसे देतांना हे पाकीट महाग का दिले ? याचा जाब विचारत त्यांनी वाद घालण्यास सुरूवात केली. यातून ग्राहक आणि हाॅटेलच्या नोकरामध्ये बाचाबाची झाली. प्रकरण हातघाईवर आले, तेव्हा एकाने थेट पिस्तूल काढले आणि हवेत एक राउंड फायर केला. त्यामुळे घाबरलेल्या नोकराने हॉटेलचे शटर लावून घेतले. त्यामुळे राग आलेल्या व्यक्तीने शटरवरही दोन राउंड फायर केले. या प्रकरणी विलास आघाव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT