औरंगाबाद : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पैठण येथे होणाऱ्या सभेवर टीका केली होती. मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी पैसे देऊन गर्दी जमवली जात असल्याचा व सरकारी यंत्रणाचा गैरवापर केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. यावर रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांनी सडकून टीका करत अंबादास दानवे यांनी आधी जनतेतून निवडून येऊन दाखवावे मग आमच्यावर टीका करावी असा, हल्ला केला आहे.
पैठणच्या जनतेचे आमच्यावर प्रेम असल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सभेला मोठी गर्दी होणार असा दावा देखील भुमरे यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज दुपारी दोन वाजता पैठण येथे जाहीर सभा व नागरी सत्कार होणार आहे. हा सोहळा व सभा जल्लोषात व मोठ्या गर्दीत साजरा व्हावा यासाठी भुमरे पिता-पुत्र गेल्या आठवडाभरापासून प्रयत्न करत आहेत.
यानिमित्ताने बंडखोरीनंतर भुमरे यांच्या मतदारसंघांमध्ये हे पहिलेच शक्ती प्रदर्शन असणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा सत्कार व सभा अलोट गर्दीत झाली पाहिजे यासाठी भुमरे यांनी कंबर कसली होती. दरम्यान या सभेसाठी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना उपस्थित राहण्याचे फर्मान शिक्षण विभागाकडून काढण्यात आल्याचे पत्र विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी ट्विट करत भुमरे यांच्यावर टीका केली होती.
मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी प्रत्येकी दीड हजार रुपये देऊन गर्दी जमवली जात असल्याचा आरोप देखील दानवे यांनी केला होता. यावर संदिपान भुमरे यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त करत अंबादास दानवे यांनी आधी जनतेतून निवडून येऊन दाखवावे मग आमच्यावर टीका करावी. पैठणच्या जनतेचे आमच्यावर प्रेम आहे म्हणूनच त्यांनी आम्हाला 25 30 वर्षे निवडून दिले. तेव्हा दानवे यांनी टीका करण्याआधी तुम्हाला गर्दी जमवण्यासाठी पैसे देऊन माणसे आणावे लागत असतील आम्हाला त्याची गरज नाही असा पलटवार केला. दरम्यान दरम्यान आज मुख्यमंत्र्यांच्या नागरी सत्कार सोहळा व सभेला किती गर्दी होते याकडे भुमरे विरोधकांचे लक्ष असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.