Pankaja Munde News
Pankaja Munde News Sarkarnama
मराठवाडा

Pankaja Munde News : पाच वर्षांची चिमुकली पंकजा मुंडेंची जबरा फॅन ; थेट भेटायला परळीत..

विनोद जिरे

Beed News : राज्यातील बोटावर मोजण्या इतक्या ज्या नेत्यांचे चाहते सर्वत्र आहेत, त्या यादीत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचे देखील नाव घ्यावे लागले. दिवंगत गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचा राजकीय वारसा समर्थपणे पेलणाऱ्या पंकजा यांची भाषण करण्याची पद्धत, देहबोली, कार्यकर्त्यांशी, सर्वसामान्यांशी संवाद साधण्याची कला पाहून त्यांच्या चाहत्यांना त्यांच्यामध्ये गोपीनाथ मुंडे दिसतात असे बोलले जाते.

ज्या नेत्यांनी आपल्या समर्थकांवर गारूड केले आहे, त्यापैकीच एक पंकजा मुंडे.(Pankaja Munde) तर अशा या पंकजा यांची एक पाच वर्षाची चिमुकली अशीच जबरा फॅन निघाली. नांदेड जिल्ह्यात राहणारी पाच वर्षाची शर्वरी असे तिचे नाव. (Beed) आपल्या आवडत्या पंकजाताईंना भेटण्यासाठी ती थेट परळीत आई-वडिलांना घेवून आली. तिची भेटण्याची प्रबळ इच्छा पाहून पंकजा मुंडे यांनीही तिला भेट देत तिचे कौतुक केले.

या एका नेत्यांची आणि त्यांच्या फॅनच्या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात चांगली होतांना दिसते आहे. (Marathwada) आपल्याला पंकजाताईंना भेटायचंच असा हट्ट तिने कुटुंबियांकडे धरला होता. पंकजा मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग राज्यात व राज्याबाहेरही आहे. सर्व सामान्य घटकांमध्ये त्या विशेष लोकप्रिय आहेत. केवळ तरूण, तरूणीच नाही तर लहान मुलेही त्यांचे अनुकरण करतात.

अशाच पाच वर्षाच्या शर्वरी हिला देखील पंकजा मुंडे यांची भुरळ पडली आणि ती त्यांना खास भेटायला म्हणून आई-वडिलांना घेऊन नांदेडहून परळीत आली. नांदेड येथील साईनाथ हमंद यांची मुलगी शर्वरी हिला पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाचे प्रचंड वेड आहे. त्यांची भाषणे, मुलाखती, त्याचबरोबर त्यांच्यातील कणखरपणा तीला आवडतो. पंकजा मुंडे यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी काही मिनिटे तरी बोलता यावे, अशी तिचा इच्छा होती.

पंकजा मुंडे परळीत असल्याचे तिला समजले आणि तिने आई-वडिलांना घेवून थेट परळी गाठली. पंकजा याही तिला भेटल्या, तिच्याशी छान गप्पा मारल्या. तिने गायलेले गाणंही ऐकलं. तिच्यासोबत फोटो काढले आणि एवढया लहान वयात तिच्या अंगी असलेल्या कलागुणांच तोंडभरून कौतुकही केले. शर्वरीसारखी चुणचुणीत मुलगी आपली फॅन असल्याचं पाहून त्या भारावून गेल्या होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT