Airlines Services Start In March Sarkarnama
मराठवाडा

राज्यातील छोट्या विमानतळांवरून महिन्याभरात उड्डाणे

जिल्हास्तरावर विमानतळ विकास प्राधिकरण व महाराष्ट्र चेंबरतर्फे प्रशिक्षण केंद्र उभारून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार (Maharashtra Chamber of Commerce and Industries)

सरकारनामा ब्युरो

मुंबई : अमरावती विमानतळावरून यावर्षी नोव्हेंबर महिन्यात उड्डाणे सुरू होतील तर पुणे-शिर्डी-नागपूर विमानसेवा या महिन्यात तसेच पुणे-औरंगाबाद-नागपूर विमानसेवा एक मार्चपासून सुरु होईल, (Mumbai) अशी घोषणा महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष दिपक कपूर यांनी केली. (Maharashtra) या विमानतळांचा विकास आणि समस्या या विषयावर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या पुढाकाराने आयोजित बैठकीत कपूर यांनी ही ग्वाही दिली. (Marathwada)

या बैठकीत प्रामुख्याने कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या विभागातील शेतमालाला बाजारपेठ मिळण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरीय माल वाहतूक विमानसेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. कोल्हापूर विमानतळाचे विस्तारीकरण जलदगतीने पूर्ण करण्याची मागणीही गांधी यांनी केली.

औरंगाबाद विमानतळावरून नवीन मार्ग सुरू करणे, जळगाव विमानतळावरून मालवाहतूक सुरु करणे, नाशिक विमानतळावरील सुविधा वाढवणे यासंदर्भात गांधी यांनी बैठकीत सूचना केल्या. जिल्हास्तरावर विमानतळ विकास प्राधिकरण व महाराष्ट्र चेंबरतर्फे प्रशिक्षण केंद्र उभारून स्थानिक युवकांना विमानसेवेशी निगडित रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील असेही ते म्हणाले.

या शिवाय सरकारकडून शिर्डी येथे स्वतंत्र कार्गो टर्मिनल, अमरावती विमानतळासाठी राज्याकडून २३ कोटी, व तेथून नोव्हेंबर २०२२ पासून प्रवासी विमानसेवा सुरु, पुणे शिर्डी नागपूर विमानसेवा १८ फेब्रुवारी पासून अलायन्स एअरतर्फे, पुणे औरंगाबाद नागपूर सेवा १ मार्चपासून, तीन महिन्यांत कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारासाठी ६४ एकर जमिनीचे संपादन व रत्नागिरी विमानतळाचा विकास सुरु करण्याचे आश्वासन देखील यावेळी सरकारकडून देण्यात आले.

राज्यातील जिल्हे व महानगरांना जोडण्यासाठी नवीन हवाईमार्ग सुरू करण्याची सूचना वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी यांनी केली. चेंबरच्या नागरी विमानोड्डाण समितीचे सुनीत कोठारी यांनी, विमानसेवा पुरवणाऱ्या कंपनांच्या इंधनाचा मूल्यवर्धित करात कपात करून तो एक टक्का करावा, असे सुचविले. शिष्टमंडळात वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी, उपाध्यक्ष करूणाकर शेट्टी, उपाध्यक्ष सौ शुभांगी तिरोडकर, उपाध्यक्ष रवींद्र माणगवे, उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, उपाध्यक्ष चंद्रशेखर पुनाळेकर, सुनीत कोठारी, प्रभारी सरकार्यवाह सागर नागरे होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT