Shivsainik Wrote Blood Letter to Cm Thackeray
Shivsainik Wrote Blood Letter to Cm Thackeray Sarkarnama
मराठवाडा

आमच्यासाठी मातोश्रीचा आदेशच अंतिम ; शिवसैनिकाची रक्ताने पत्र लिहित मुख्यमंत्र्यांना ग्वाही..

जलील पठाण

औसा : राज्यात शिवसेनेला खिंडार पडून सेना संपविण्याचा घाट घातला जात असताना तळागळातील सच्चा शिवसैनिक ठाकरे कुटुंब आणि मातोश्रीसाठी आपले रक्त संडायला तयार आहे. (Latur District) गद्दारानी कितीही डावपेच आखले तरी मातोश्रीचा आणि ठाकरे कुटुंबाचाच आदेश आमच्यासाठी अंतिम असल्याचे सांगत औशातील सेनेचे उपशहर प्रमूख सचिन पवार यांनी आपल्या रक्ताने एक पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सचिन पवार यांनी स्वतःच्या रक्ताने लिहिलेल्या पत्रात मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगितले आहे की, "ज्यांनी आम्हाला नाव दिलं, इज्जत दिली. ज्या शिवसेनेमुळे आमचा नावलौकिक झाला. त्या शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख यांच्याबरोबर आम्ही शेवटपर्यंत टिकून राहू. गद्दार किती येतील व जातील पण सच्चा शिवसैनिक पक्षाशी गद्दारी कधीच करणार नाही.

उद्धवसाहेब आज जे संकट आपल्यावर आणि पक्षावर आले आहे त्याला हा शिवसैनिक निधड्या छातीने टक्कर देईल. गद्दाराच्या पंक्तीत बसणाऱ्यांनो वेळीच परत या नाहीतर महाराष्ट्रात रक्तरंजीत इतिहास पुन्हा रचला जाईल एवढंच सांगतो. मी शिवसेनेसोबत, साहेबासोबत. आपला शिवसैनिक सचिन पवार."

मातोश्री आमचं श्रद्धास्थान आहे, मातोश्री व पक्षप्रमुखांचा आदेश आमच्यासाठी अंतिम असून काही बोटावर मोजता येतील इतके गद्दार जरी निघाले तरी आमच्यासारखे प्रामाणिक व बाळासाहेबांचे लाखो खरे शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत.

माझी अजूनही गेलेल्या लोकांना विनंती आहे त्यांनी परत यावे, उद्धव साहेबांचे मन खूप मोठे आहे, मोठ्या अंतकरणाने ते तुम्हाला माफ करतील, अशी एक शिवसैनिक म्हणून मला आशा आहे. विस्तवाशी खेळायचा प्रयत्न कोणी करू नका. भस्म व्हाल असा इशाराही या शिवसैनिकाने दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT