Senior Leader Pundlik Hari Danve
Senior Leader Pundlik Hari Danve Sarkarnama
मराठवाडा

जालन्याचे माजी खासदार पुंडलिक हरी दानवे यांचे निधन

सरकारनामा ब्युरो

जालना ः जालना लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी पुंडलिक हरी दानवे यांचे आज सकाळी दहा वाजता वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले. गेल्या दीड महिन्यापासून ते आजारी होते, रुग्णालयात उपचार सुरू असतांना आज त्यांची प्राणज्योत मालवली.

एक प्रामाणिक देशभक्त, निष्कलंक खासदार, महाराष्ट्रातील व देशातील जुनं जाणतं तत्वनिष्ठ राजकीय व्यक्तिमत्व हरवल्याच्या प्रतिक्रिया सर्वसमान्यांमधून उमटत आहेत. उद्या (ता.२) रोजी दुपारी साडेबारा वाजता त्यांच्या पार्थिवावर मूळगावी पिंपळगाव (सुतार) ता.भोकरदन जि.जालना येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

त्यांच्या पश्चात तीन मुले भोकरदनचे माजी आमदार चंद्रकांत दानवे, बबनराव, सुधाकर दानवे व एक मुलगी असा परिवार आहे. पुंडलिक दानवे जनसंघाचे जुने नेते व भाजपचे संस्थापक सदस्य होते. अटलबिहारी वाजपेयींच्या सहवासात त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरूवात केली होती.

साधे व्यक्तिमत्त्व,साधी राहणी व उच्च विचारसरणी अशी त्यांची ओळख होती. जालना लोकसभा मतदरासंघाचे दोनवेळा त्यांनी नेतृत्व केले होते. ७७ ते ८० दरम्यान ते जनता पक्षाचे खासदार होते, तर त्यानंतर ८९ ते ९१ मध्ये दुसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीकडून खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेले होते. राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांचे ते वडिल होत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT